43.7 C
Gondiā
Monday, June 8, 2026
Home Top News यवतमाळच्या शेख इस्माईलचे हेलिकॉप्टर निर्मितीचे स्वप्न अपूर्ण,चाचणीदरम्यान झाला मृत्यू

यवतमाळच्या शेख इस्माईलचे हेलिकॉप्टर निर्मितीचे स्वप्न अपूर्ण,चाचणीदरम्यान झाला मृत्यू

0
193

blank

यवतमाळ,दि.11ः- जिल्ह्यातील फुलसावंगी गावातील शेख इस्माईल गेल्या चार वर्षापासून सिंगल सीट हेलिकॉप्टर बनविण्याचे स्वप्न सत्यात उतवरण्यासाठी प्रयत्न करत होते. कुटुंबाचा आर्थिक गाडा चालवण्यासाठी ते दिवसभर वेल्डिंगच्या दुकानात काम करुन रात्री आपले हेलिकॉप्टर तयार करण्याचे काम करत होते. अशातच हेलिकॉप्टर बनविण्याचे काम पूर्ण होताच, मंगळवारी रात्री ट्रायलदरम्यान हेलिकॉप्टरचा फॅन तुटला आणि पायलट शेख इस्माईल शेख यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती महागाव पोलिसांनी दिली आहे.आणि  शेख इस्माईलचं हेलिकॉप्टर निर्मितीचे स्वप्न अपूर्ण राहिले आहे.

शेख इस्माईल यांचे केवळ ८ वी पर्यंत शिक्षण झाले होते. मात्र आपल्या इच्छाशक्तीच्या जोरावर त्यांनी एकदिवस हेलिकॉप्टर तयार करण्याचे ठरवले. हळूहळू एक एक पार्ट तयार करत ३ वर्षांच्या प्रयत्नानंतर येत्या १५ ऑगस्ट रोजी प्रात्यक्षिक घेऊन पेटेंट मिळवायची त्यांची तयारी झाली होती. १० ऑगस्टच्या रात्री त्यांनी बनविलेल्या हेलिकॉप्टरची ट्रायल घेण्यास सुरुवात केली. जमिनीवर इंजिन सुरु केलेले इंजिन ७५० अम्पियरवर फिरत होते. सर्व गोष्टी व्यवस्थित सुरु असताना अचानक हेलिकॉप्टर मागचा फॅन तुटला आणि मुख्य फॅनला येऊन धडकला. यावेळी तो फॅन इस्माईल यांच्या डोक्यात आदळला. यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. यात उपचारादरम्यान शेख इस्माईलचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांचा पश्चात त्याची आई, वडील, भाऊ, बहिण असा परिवार आहे. त्यांच्या मृत्यूमुळे गावात शोककळा पसरली आहे.

blank