41.4 C
Gondiā
Sunday, June 7, 2026
Home राजकीय निवडणुकीची जबाबदारी ज्यांच्यावर होती, त्यांनाच पराभवासाठी जबाबदार धरा

निवडणुकीची जबाबदारी ज्यांच्यावर होती, त्यांनाच पराभवासाठी जबाबदार धरा

0
31

blank

नवी दिल्ली, दि. १० – बिहारमधल्या दारूण पराभवासाठी या निवडणुकीची जबाबदारी ज्यांच्यावर होती, त्यांनाच जबाबदार धरा असे सांगत आडवाणी, जोशी आदी ज्येष्ठांनी मोदी-शाह आदींवर निशाणा साधला आहे.  भाजपा दिल्लीतल्या पराभवानंतर काहीच शिकली नसल्याचे खापरही भाजपातल्या बाजुला टाकल्या गेलेल्या ज्येष्ठांनी नव्या नेत्यांवर फोडले आहे.
लालकृष्ण आडवाणी, मुरली मनोहर जोशी, शांताकुमार आणि यशवंत सिन्हा यांनी बिहारमधल्या पराभवासाठी कुणालाच जबाबदार न धरल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले आहे, तसेच तटस्थ समिती नेमून पराभवासाठी कोण जबाबदार आहे याचा शोध घ्यायला पाहिजे असे प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

blank