
अर्जुनी मोरगाव,दि.14ः- सर्वत्र कोरोनाचा विळखा असताना हमाल शेतकऱ्यांचे धान्य शासन, एजन्सीमार्फत खरेदी करण्याचे कार्य हमाल करत होते. धान्य खरेदी संस्था, व्यापारी वर्ग व इतर सर्व महत्वाचे कार्य हमाल आपले घाम गाळून विकासात्मक कार्य घडवून आणले. कृषी उत्पन्न बाजार समिती मार्फत परवाना परवानाधारक हमाला च्या विकासासाठी शासनाच्या कल्याणकारी योजना करीता पाठपुरावा करणार असल्याचे प्रतिपादन कृषी उत्पन्न बाजार समिती अर्जूनी मोरगाव चे मुख्य प्रशासक लोकपाल गहाणे यांनी केले.
कृषी उत्पन्न बाजार समिती अर्जुनी मोरगाव येथे 13 ऑगस्ट रोजी हमालांना परवाना वितरण कार्यक्रमाचे आयोजन केले होते याप्रसंगी मुख्य प्रशासक लोकपाल गहाणे, प्रशासक बंशिधर लंजे ,उद्धव मेहंदळे, गिरीश पालीवाल इतर उपस्थित होते. यावेळी हमालांच्या अडीअडचणी व इतर विषयावर सविस्तर चर्चा झाली. याप्रसंगी उद्धव मेहेंदळे लोकपाल गाणे गहाणे यांनी हमालांना मार्गदर्शन केले अरविंद जांभुळकर यांनी हमाला साठी अशाप्रकारे पहिल्यांदाच सभेचे आयोजन केल्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीचे अभिनंदन केले. इतरांनी सुद्धा समस्या मांडल्या त्यावर समस्या बाजार समितीच्या वतीने सोडण्यात येईल असे सांगण्यात आले. याप्रसंगी जवळपास 150 हमाल उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रभारी सचिव संजय सिंगन जुडे व आभार धम्मदीप मेश्राम यांनी व्यक्त केले . कार्यक्रमाचे यशस्वितेकरिता भरत वाढई,दुलिराम मेश्राम,अशोक जुगादे ,मंगेश डोये
योगेश मैंद व इतरांनी परिश्रम घेतलेत.





