33.1 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home विदर्भ चुटिया येथे मोबाइल टॉवरचे थाटात उदघाट्न

चुटिया येथे मोबाइल टॉवरचे थाटात उदघाट्न

0
53

blank

गोंदिया : नजिकच्या चुटिया येथे नेटवर्क समस्यांनी नागरिक त्रस्त होते. नेटवर्क समस्येला घेवून विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण घेत असताना फटका बसत होता. याची दखल शेतकरी नेते संजयसिंह टेभंरे यानी पुढाकार घेत जिओ कंपनीशी करारनामा करून जिवो टॉवर उभारण्यास परवानगी दिली. यामुळे टॉवर उभारणीे काम पूर्ण झाले असून ७ ऑगस्ट रोजी या टॉवरचे उद्घाटन करण्यात आले.
कार्यक्रमाला भाजप किसान आघाड़ीचे जिल्हाध्यक्ष संजयसिंह टेभंरे, टिकाराम टेंभरे, रतन बघेले, कुंडलिक तुरकर, हिरालाल टेंभरे, डॉ.मुनालाल तुरकर, प्रकाश मेश्राम, अभिलेश खोब्रागडे, बबलु राणे, राजकुमार टेकाम, संतोष राहंगडाले, पुरण भंडारी, डॉ.सुनील कटरे, बाबुलाल राहंगडाले, हरिलाल गराकाटे, दिपक हरिणखेडे, सुनील गराकाटे, हुमलीक तुरकर, डिलेश शरणागत, दुर्गा प्रसाद कुरंजेकर, येवक राहंगडाले, सेवक राहंगडाले, रुपचंद शरणागत, राधेलाल राहंगडाले, मनोज राऊत, मुन्ना पटले, घनश्याम पटले, सुभाष गडपायले, तिलकचंद गौतम, सुरेंद्र दमाहे, राजेंद्र भालाधरे, सुभाष शरणागत, मगन दिहारी, मुन्ना राणा, दिनेश दिहारी आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी भाजप किसान आघाडीचे जिल्हाध्यक्ष संजयसिंह टेंभरे यांच्या हस्ते टॉवरचे उद्घाटन करण्यात आले. या टॉवरमुळे परिसरातील नेटवर्कची समस्या सुटणार आहे. याचा लाभ परिसरातील शेतकरी, सर्वसामान्य व विद्यार्थ्यांना होणार आहेत. कवरेज समस्येने त्रस्त असलेले नागरिक, गावातील व क्षेत्रीय युवक व विद्यार्थ्यांच्या पाल्यांनी आभार व्यक्त केले.

blank