38.6 C
Gondiā
Sunday, June 14, 2026
Home विदर्भ मोरवाही येथील आंदोलनाला कांग्रेस शिस्टमंडळाची भेट

मोरवाही येथील आंदोलनाला कांग्रेस शिस्टमंडळाची भेट

0
54

blank

समस्या शासन दरबारी उचलण्याची ग्वाही
गोंदिया-(ता.16) गोंदिया तालुक्यातील मोरवाही येथे सुरू असलेल्या उपोषण मंडपाला जिल्हा कांग्रेस च्या वतीने शनिवारी( ता.14)भेट देण्यात आली.यावेळीशिष्टमंडळात काँग्रेस चे वरिष्ठ नेते माजी आमदार दिलीप बनसोड, गप्पू गुप्ता, इंजि.राजीव ठकरेले,राजकुमार (पप्पू) पटले,डोमेश चौरागडे, प्रदिप सहारे, मुकेश बरईकर,सुरेश कावळे उपस्थित होते.
सदर बुद्ध विहाराचे बांधकाम मागील दोन वर्षांपासून रेंगाळत ठेवून स्थानिक ग्रामपंचायत तसेच त्यांच्या कंत्राटदारांनी स्थानिक बौद्ध समाजाला अंधारात ठेवले आले. हा येथील बौद्ध समाजावर झालेला मोठा अन्याय आहे.त्यामुळे मोरवाही येथील बौद्ध समाजाला न्याय मिळणे आवश्यक आहे असे मत यावेळी शिष्टमंडळाने मांडले.आपण हा प्रश्न जिल्हा प्रशासनाकडे व बांधकाम विभागाकडे उचलून धरू व निश्चितच या बौद्ध बांधवाना न्याय मिळवून देण्यास मदत करू असे अस्वासन यावेळी उपस्थित शिष्टमंडळाने आंदोलन कर्त्यांना दिले.या दरम्यान स्थानिक कांग्रेस कार्यकर्ते तसेच आंदोलन कर्ते बौद्ध बंधू भगिनी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.