33.7 C
Gondiā
Sunday, June 14, 2026
Home विदर्भ युवा पुरस्काराने उडान संस्था सन्मानित: पालकमंत्र्याच्या हस्ते पुरस्कार प्रदान

युवा पुरस्काराने उडान संस्था सन्मानित: पालकमंत्र्याच्या हस्ते पुरस्कार प्रदान

0
36

blank

गोंदिया: महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा धोरणानुसार जिल्हयातील युवक, युवती व संस्थानी केलेल्या समाज हिताचा कार्याचा गौरव करण्यासाठी व त्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी जिल्हा युवा पुरस्कार देण्यात येतो. सन २०१९-२० या वर्षाचा युवा पुरस्कार आमगाव तालुक्याच्या पदमपूर येथील उडान बहुउद्देशिय विकास संस्थेला पालकमंत्री नवाब मलीक यांच्या हस्ते स्वातंत्र्यदिनी पोलीस मुख्यालय कारंजा येथील शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमात प्रदान करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी नयना गुंडे, पोलीस अधिक्षक विश्व पानसरे, जिल्हा क्रीडा अधिकारी घनश्याम राठोड, क्रीडा अधिकारी ए.डी.मरस्कोल्हे, राज्य क्रिडा मार्गदर्शक एन. एस. उईके, धनंजय बारसागडे, तालुका क्रीडा अधिकारी राजेंद्र शिंदे उपस्थित होते. आमगाव तालुक्याच्या पदमपूर येथील उडान बहुउद्देशिय विकास संस्थेत समाजसेवेत केलेल्या उल्लेखनिय कार्यामुळे या संस्थेला शासनाचा युवा पुरस्कार म्हणून गौरवपत्र, सन्मानचिन्ह व ५० हजार रूपये रोख प्रदान करण्यात आला. उडान संस्थेने, रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर, पुरपिडीतांना मदत, वृक्षारोपण, कोविडच्या संकटातही गरजूंना मदत, स्वच्छता मोहीम, प्लास्टीकमुक्त संकल्पना, पाणी बचत, पक्षी बचाव, चिनी वस्तूंचा बहिष्कार, एड्‌स जनजागृती, सिकलसेल जनजागृती, साक्षरता, जेष्ठांचा सन्मान, बालकांना त्यांचा हक्क, शाळाबाह्य मुलांचा शोध घेणे, व्यसनमुक्त समाज, क्षयरोग जनजागृती, प्राण्यांना जीवनदान, वनराई बंधारा निर्मीती, निराधार, विधवा, परित्यक्ता यांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून नेण्यासाठी मदत करण्यासारखे कार्य या संस्थेने केल्यामुळे या संस्थेला पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार संस्थेचे कोषाध्यक्ष रविकांत पाऊलझगडे, अध्यक्ष आशिष तलमले, नरेश येटरे, प्रेमानंद पाथोडे, अतूल फुंडे, सचिन तलमले, दिनेश गिऱ्हेपुंजे, प्रिनल वंजारी, दीपक भांडारकर, नरेश बोहरे, रामभरोस चक्रवर्ती, मोहन ब्राम्हणकर, विजय कोरे, हिमालय राऊत, ज्ञानेश्वर खोटेले, प्रणय फुंडे, प्रवीण कोहळे, हरिष भुते, अरूण भुते, हार्दीक भुते, जीवन फुंडे नरेश रहिले व इतरांनी स्वीकारला.