36.6 C
Gondiā
Monday, June 8, 2026
Home विदर्भ दाभना येथे शासकीय सेवेत रुजू झालेल्या युवकांचा स्वातंत्र्यदिनी सत्कार

दाभना येथे शासकीय सेवेत रुजू झालेल्या युवकांचा स्वातंत्र्यदिनी सत्कार

0
60

blank

अर्जुनी मोरगाव,-तालुक्यातील दाभना येथे शासकीय सेवेत रुजू झालेल्या दोन युवकांचा स्वातंत्र्यदिनी सत्कार करण्यातआला.दाभणाचे सरपंच डॉ.दीपक राहिले यांच्या नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत दरवर्षी गावातील होतकरू नागरीकांना सन्मान दिला जातो.
भारतीय स्वातंत्र्याच्या पंचायत करावा स्वातंत्र्य दिन उत्साह मध्ये सर्वत्र साजरा करण्यात आला तालुक्यातील ग्रामपंचायत ध्वजारोहणानंतर गावातील शासकीय सेवेत रुजू झालेल्या बिपिन मोरेश्वर मेश्राम आणि भावेश हरीराम सूर्यवंशी यांचा ग्रामपंचायत सरपंच रहिले,उपसरपंच चरणदास घासले यांच्या वतीने शाल,श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
1 एप्रिल ते 13 ऑगस्ट 2021 या कालावधीत ज्या नागरिकांनी ग्रामपंचायत कराचा भरणा पूर्णतः केला. अशा नागरिकांचा ईश्वर चिठ्ठीने रोख पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला.प्रथम पारितोषिक 2 हजार शकुंतला मोतीराम ब्राह्मणकर,द्वितीय 1500 मीरा देवदास प्रधान,तृतीय एक हजाराच्या सुनील शिवा प्रधान पारितोषिकाचे मानकरी ठरले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य अरविंद कुंभरे,जगन मेश्राम, गीता प्रधान,वनीता मानकर, रेवता पीहीदे,प्रतिभा ब्राह्मणकर, ग्रामसेविका चित्रा बागडे,तमुस अध्यक्ष अरविंद गोंडाणे,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दीपक मानकर आणि गावातील नागरिक उपस्थित होते.

blank