30.5 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home विदर्भ ‘माविम’च्या वतीने कोविड-१९ जनजागृती कार्यक्रम पत्रिकेचे विमोचन

‘माविम’च्या वतीने कोविड-१९ जनजागृती कार्यक्रम पत्रिकेचे विमोचन

0
27

blank

वाशिम, दि. १८: युनिसेफ व महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने कोविड १९ प्रार्दू भाव संदर्भात जाणीव जागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून याबाबतच्या कार्यक्रम पत्रिकेचे विमोचन माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी राजेश नागपुरे यांच्या हस्ते १५ ऑगस्ट रोजी करण्यात आले .

कोरोनाच्या प्रादुर्भावापासून वाचण्यासाठी व स्वतःच्या कुटुंबाची जबाबदारी कशी पार पाडावी, याकरीता युनिसेफ व माविमच्या वतीने एक मार्गदर्शक पत्रिका तयार करण्यात आली आहे. यामध्ये नागरिकांना मास्कचा वापर करावा, लसीकरण करून घेणेबाबत माहिती देण्यात आली आहे. या पत्रिकेचे विमोचन १५ ऑगस्ट रोजी माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी राजेश नागपूर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी त्यांनी जिल्ह्यातील माविमचे संपूर्ण महिला बचत गट व इतर गावातील नागरिकांना पत्रिकेचे माध्यमातून सजग करण्यात येणार असल्याचे सांगितले. यावेळी सहाय्यक जिल्हा समन्वय अधिकारी समीर देशमुख, एएमओ कल्पना लोहकपुरे, राहुल मोकळे, पुरुषोत्तम हातोलकर, आनंद काळे, तसेच सर्व लोकसंचालित साधन केंद्रचे व्यवस्थापक लेखापाल, सहयोगीनी उपस्थित होते. कोविड-१९ बाबत जाणिव जागृती कार्यक्रमाला यामुळे गती प्राप्त होणार आहे.

blank