40.3 C
Gondiā
Saturday, June 13, 2026
Home राजकीय दौंड तालुक्यात राष्ट्रीय समाज पक्षाला मजबूत करा : अजित दादा पाटील

दौंड तालुक्यात राष्ट्रीय समाज पक्षाला मजबूत करा : अजित दादा पाटील

0
79

blank

दौंड,दि.23ः- राष्ट्रीय समाज पक्ष दौंड तालुक्याची आढावा बैठक पाटस (मोटेवाडा)येथे बैठक आयोजित केली होती. त्या बैठकीस ज्ञानेश्वर उर्फ माऊली सलगर पश्चिम महाराष्ट्र प्रभारी, अजितदादा पाटील युवक प्रभारी पश्चिम महाराष्ट्र, किरण गोफणे पुणे जिल्हा प्रभारी, यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक पार पडली.माऊली नाना जानकर कसे घडले हे पटवून सांगत राष्ट्रीय समाज पक्षाची ध्येय धोरण समजून सांगितली.पक्षांच दौंड तालुक्यात काम वाढवा 2024 ला दौंड तालुक्यात राष्ट्रीय समाज पक्षांचा आमदार असेल असे सूतोवाच अजितदादा पाटील यांनी केले. किरण गोफने यांनी शेती जमिनीबाबत मेंढपाळ बांधवांन जो अन्याय झाला तो आम्ही करणार त्याना न्याय मिळवून दिल्याशिवाय शांत बसणार नाही असा शब्द दिला.
हनुमंत थोरात यांनी दौंड तालुक्याचा आढावा वरिष्ठांना दिला प्रत्येक गावात राष्ट्रीय समाज पक्षाची शाखा ओपन करणार येणारी नगरपालिका पंचायत समिती जिल्हापरिषद च इलेक्शन स्वबळावर लढू पूर्ण ताकतिनिशी निवडणूकीला उमेदवार रिंगणात उतरणार आहोत. या बैठकीस उपस्थित बाबा कोळेकर (विद्यामान ग्रामपंचायत सदस्य पाटस).विकास कोळपे(विद्यामान ग्रामपंचायत सदस्य पाटस);भीवा कचरे ;रघूनाथ करगळ;दादासाहेब भिसे ;हनुमंत थोरात ;किरण पांढरे ;गणेश पांढरे ;कांतिलाल देवकाते;कालिदास दगडे;वाघमोडे ;चोरमले;गणेश बरकडे; भीवा बीचकुले; रावा खडके;सर्व मोटेवाड्यातील ग्रामस्थउपस्थित होते.राष्ट्रीय समाज पक्ष दौंड तालुका आणि हनुमंत थोरात मित्र परिवार दौंडच्यावतीने बैठकीला उपस्थितांचे आभार मानण्यात आले.