
गोंदिया,दि.13ः- गोंदिया व भंडारा जिल्हे हे धान उत्पादक शेतकर्यांचा जिल्हा असून या भागाचे पालकत्व प्रफुल पटेल यांनी घेतले आहे.पटेल यांच्या प्रयत्नामुळेच महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांना ७०० रुपये बोनस देऊन धान उत्पादकांना मोठा दिलासा दिला आहे. दोन्ही जिल्ह्यातील जलसिंचन व प्रलंबित सिंचन प्रकल्पाचे कामे मार्गी लावण्यासाठी सातत्याने बैठक घेऊन प्रश्न निकालात काढण्यासाठी अधिकार्यांना निर्देश दिले आहे. ओबीसीचे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राजकीय घटनात्मक आरक्षण शरदचंद्र पवार यांनी मिळवून दिले. मागील भाजप सरकारच्या चुकीमुळे व केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे ओबीसीचे आरक्षण अडचणीत आले हे ओबीसी बांधवांना पटवून देण्याची वेळ आली आहे.तसेच युवकांनी गावा गावात बूथ कमिटी तयार करून युवकांना जास्तीत जास्त स्थान द्यावे. आगामी जिल्हा परिषद, नगर परिषद निवडणूकांसाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेस सज्ज असली पाहिजे.येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीत जास्तीत जास्त युवकांना प्राधान्याने उमेदवारी देण्यात येईल असे विचार राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी व्यक्त केले.ते गोंदिया येथील रेलटोली स्थित राष्ट्रवादी काँग्रेस भवनात आयोजित युवक काँग्रेसच्या बैठकीत बोलत होते. बैठकीला प्रदेश कार्याध्यक्ष रविकांत वरपे, माजी आमदार राजेंद्र जैन,जिल्हाध्यक्ष विजय शिवणकर,आमदार मनोहर चंद्रीकापुरे,महिला अध्यक्ष राजलक्ष्मी तुरकर उपस्थित होते.
सदर बैठकीत राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्ष संघटन, मजबुती व आगामी काळात येणाऱ्या निवडणुका इत्यादी बाबींवर चर्चा करण्यात आली. या कार्यक्रम प्रसंगी सर्वश्री किशोर तरोणे, रफिक खान, ऍड नेहा शेंडे, केतन तुरकर, अरुण असबे, सौरभ मिस्रा, शैलेंद्र तिवारी, लोकपाल गहाणे, विनायक शर्मा, दिनेश कोरे, नितिन टेभरें, रविकुमार पटले, नीरज उपवंशी, आर.दि अग्रवाल, इम्रान शेख, रंजित टेभरें, दिलप्रीतशिंग वोरा, रोहित पटले, माधुरी सहारे, श्रुती कावळे, स्वाती स्वाती दमाहे, सायमा खान, रुपाली रोटकर, सौरभ रोकडे, एकनाथ वाहिले, चेतन कुंभारे, चाहत मेश्राम, आकाश नागपुरे, नियाज शेख, त्रिलोक तुरकर,संकेत पटले, विजय कोल्हे, प्रमोद महाजन, रवींद्र मस्करे, अनिल रहांगडाले, प्रवीण बीजेवार, कमलेश बारेवार, राजकुमार बोपचे, गुड्डू ठवरे, आशिष चौधरी, यश रहांगडाले, देवेश्वर रहांगडाले, विक्रांत तुरकर, राजेश तुरकर, भूमेश्वर पारधी, राजेश गोटेफोडे, भवानी बैस, खुशाल वैद्य, राजेश येरणे,विप्लव वाघाये, टिपु सय्यद, राजेंद्र पटले, अनुराग बोरकर, निमेद मेश्राम, विशाल पडवार, अमन घोडीचोर, संघर्ष ऊके, नितेश ठोणेकर, धिरज रामटेके, भारत पागोटे, रोहित मुनेश्वर, नितिन चकाले, नितेश येल्ले, बसंत गणवीर, सुनील पटले, शैलैश वासनिक, आशिष येरणे, योगेश बिसेन, मोंटी अन्सारी, सतिश पारधी, श्रीधर चन्ने, विरेंद्र कुमार मुरकुटे, योगेश डोये, निखिल राऊत, लव माटे, रमन उके, प्रतिक भालेराव, कान्हा बघेले, नागो बन्सोड, विशाल ठाकुर, नागरतन बन्सोड, दर्पण वानखेडे, नाजीम खान, प्रतिक वानखेडे, कृष्णा भांडारकर, राजेशकुमार तायवाडे, अजय दरवडे, बबलु कटरे, अजय दरवडे, सचिन उके, सागर राऊत, निरज नागरे, सागर भरणे, राकेश पराते, पियुष मिश्रा, शशांक खापेकर, अनमोल देशमुख, कपील बावनथडे,भुपेश गौतम, अखिलेश तुरकर, समिर लांजेवार, प्रशांत बालसनवार, राजेश नागपुरे, निकास गावळ, समस्त राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ता मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या वेळी गोंदिया राष्ट्रवादी युवक काँग्रेस च्या जिल्हाध्यक्ष पदी केतन तुरकर यांची फेरनियक्तीचे पत्र उपस्थित मान्यवरांच्या हस्ते देऊन अभिनंदन करण्यात आले.