
बल्लारपूर दि.१८: बल्लारपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांनी अवैध दारु पकडण्याची मोहिम आॅगस्ट व सप्टेंबर महिन्यात राबविली. या दरम्यान एकूण ६५ गुन्ह्यात अवैधरित्या विकल्या जाणाऱ्या देशी व विदेशी दारु साठा मोठ्या प्रमाणात जप्त करण्यात आला. यातील तब्बल ४० लाख ४७ हजार ७०० रुपये किंमतीचा दारुसाठा मंगळवारी बल्लारपूर पोलिसांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या देखरेखीखाली नष्ट केला.
येथील पोलीस निरीक्षक प्रदीप सिरसकर यांच्या मार्गदर्शनात मोहरील एम.एस. भोयर, राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक पी.पी. खाडीलकर, टी.एन. आवारी, टी.जी. राठोड, यु.एस.डुंबारे, रायपुरे यांच्या मार्फत देशी दारु ११ हजार ९४४ रुपये ९० मिीमी बॉटल, १३ हजार ७७५ रुपये किंमतीच्या १०० मिलीच्या बाटल व विदेशी दारु ३० हजार ८३ रुपये किंमतीचा असा एकूण ४० लाख ४७ हजार ७०० रुपये किमतीचा दारु नष्ट करण्याची परवानगी देण्यात आली.





