33.9 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home शैक्षणिक सत्यशोधक विचारधारेवर आधारित अभ्यासक्रमाची सुरुवात

सत्यशोधक विचारधारेवर आधारित अभ्यासक्रमाची सुरुवात

0
61

blank

यवतमाळ,दि.24ः- येथील महात्मा फुले सत्यशोधक विद्यापीठ पाठ्यक्रम निर्मिती मंडळाच्या वतीने सत्यशोधक अभ्यासक्रम निर्मितीला सुरुवात झालेली आहे.सत्यशोधक विद्यापीठ सावित्री ज्योती विहार या ठिकाणी सर्वप्रथम सत्यशोधक इमारतीमध्ये असलेल्या उद्घाटन करण्यात आले.यावेळी जय ज्योती जय भीम जय विज्ञान जय संविधान यांच्या घोषणा देण्यात आल्या. महापुरुषांना अभिवादन करण्यात आले. आणि सत्यशोधक विद्यापीठाच्या संदर्भामध्ये कोणते कोणते विषय ठेवायचे याबाबत विस्तृत अशी चर्चा करण्यात आली.सत्यशोधक विद्यापीठ पाठ्यक्रम निमिर्तीमंडळाचे मुख्य प्रवर्तक डॉ.ज्ञानेश्वर गोरे यांनी संपूर्ण अभ्यासक्रमाची रचना कशी असावी याबाबत आपले विश्लेषण केले.नागपूर येथील प्रबोधनकार प्रा.अरविंद माळी,यवतमाळचे प्रा.काशिनाथ लाहोरे,औरगांबादचे प्रा.सुदाम चिंचाने,डॉ.प्रभाकर गायकवाड,दिल्लीचे डॉ.संदीप यादव,यवतमाळचे दीपक वाघ,रवी नागरीकर,नागपूरचे जगदीश पारचे,सुनिता काळे,गौरी कुणाल पारचे पुणे,माया गोरे यवतमाळ,विजय मालखेडे यवतमाळ,राजेंद्र सैनी हरियाणा रेवाडी,विलास काळे यवतमाळ,प्राचार्य सुधीर महाजन मध्यप्रदेश,हेमन सैनी रेवारी हरियाणा,सतीश जासुतकर बुलढाणा ,डॉ.अशोक चोपडे वर्धा,दीपक उलेमाले वाशिम,प्राध्यापक श्रावण देवरे नाशिक,एड.दिलीप कोटरंगे वणी,हंसराज बनसोडे यवतमाळ,यांनी सदर चर्चासत्रामध्ये भाग घेऊन भारतातील महापुरुषांचा विचार जनमानसापर्यंत पोहोचविण्यासाठी आपल्याला कशा पद्धतीने काम करायचे आहे. कशा पद्धतीने सत्यशोधक विचार अाधारीत नवीन समाज निर्मिती करण्याकरता आपले योगदान राहील ही भूमिका सर्वांनी मांडली.या कार्यक्रमाचे समारोप डाॅ.ज्ञानेश्वर गोरे यांनी यांनी केले.

blank