
तिरोडा,दि.25ः- तालुक्यातील सुकडी डाक.23 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय पोषण महिना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये राष्ट्रीय पोषण महिना बद्दल महत्व सांगणे, पाककृती स्पर्धा, गीत गायन स्पर्धा, कडधान्य, फळे व पालेभाज्या पासुन कलाकृती स्पर्धा, पथ नाट्य, समूह गीत असे अनेक प्रकारचे कार्यक्रम भव्य स्वरूपात घेण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ग्रामपंचायतीचे सरपंच जयश्री गभने तर कार्यक्रमाचे उद्घाटक जिल्हा कार्यक्रम अधिकारी संजय गणवीर,मुख्य अतिथी बालविकास प्रकल्प अधिकारी विनोदकुमार चौधरी, प्रमुख पाहुणे म्हणून विस्तार अधिकारी तथा कंट्रोल्लिंग ऑफिसर विनोद जाधव, केंद्रप्रमुख अंबुले,प्राचार्य जाधव व अंगणवाडी पर्यवेक्षिका श्रीमती कनकलता काळे,गट समनव्यक साजन दादूरिया, श्रीमती गौतम सरपंच आलेझरी,ग्राम सेवक श्रीमती कटरे, मुख्याध्यापंक श्री ठाकरे, ग्राम पंचायत सदस्य जयश्री चंद्रिकापुरे,आशा बिसेन,इंद्राकला बावनथडे,श्यामदेव जगणे व हितेंद्र जांभुलकर, मविम गट संयोजिका श्रीमती नेहर इत्यादी होते.तसेच यावेळी सुकडी बीट मधील सर्व अंगणवाडी सेविका, मदतनीस व आशा वर्कर इत्यादी उपस्थित होते.यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित असलेले गरोदर माता, स्तनदा माता, किशोरवयीन मुली व 0 ते 6 वयोगटातील बालके यांना मार्गदर्शन व फळ वाटप करण्यात आले.





