33.9 C
Gondiā
Monday, June 8, 2026
Home राजकीय जिवनावश्यक वस्तु महाग करुन सामान्य माणसाचे जगणे केले मुश्कील – माजी आमदार...

जिवनावश्यक वस्तु महाग करुन सामान्य माणसाचे जगणे केले मुश्कील – माजी आमदार राजेंद्र जैन

0
46

blank

तिरोडा,दि.25ः- तालुक्यातील जिल्हा परिषद क्षेत्र सरांडी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची कार्यकर्ता बैठक महात्मा गांधी पुतळ्या जवळ केसलवाडा येथे माजी आमदार राजेंद्र जैन व जिल्हाध्यक्ष विजय शिवनकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. या कार्यकर्ता बैठकीला संबोधतांना माजी आमदार जैन म्हणाले की, देशातील तरुणांना रोजगार देण्याचे आश्वासन देवुन पकोडे विकण्यास रोजगार समजणारी केंद्र सरकार सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरले आहे. दैनंदिन जिवनातील आवश्यक सर्व वस्तुचे दर गगनाला भिडले आहेत. सामान्य माणसाची मिळकत कमी व खर्च वाढल्याने सामान्य माणसाचे जगणे मुश्कील झाले आहे. जनतेला वेठीस धरू पाहणाऱ्या भाजपाला धडा शिकविण्यासाठी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेस चे जास्तीत जास्त उमेदवार निवडून द्या.विजय शिवनकर म्हणाले की, गावागावात बुथ कमेटी स्थापन करुन समाजातील सर्व घटकांना त्यात सामील करावे. युवकांचा जास्तीत जास्त समावेश करावा व संगठण मजबूत करावे. या बैठकीला सर्वश्री माजी आमदार राजेंद्र जैन, जिल्हाध्यक्ष विजय शिवणकर, प्रेमकुमार रहांगडाले, राजलक्ष्मी तुरकर, रविकांत बोपचे, कैलास पटले, योगेंद्र भगत, राजू एन जैन, ओमकार लांजेवार, मनोज डोंगरे, सुनीताताई मडावी, जयाताई धावडे, डॉ. किशोर पारधी, निताताई रहांगडाले, जितेंद्र पारधी, किरण बंसोड, संदीप मेश्राम, वा. टी. कटरे, नासीर धानीवाला, देवेंद्र चौधरी, मनोहर राऊत, रामसागर धावडे, जगदीश बावनथडे, राजू ठाकरे, चुन्नीलाल पटले, भूमेश्वर पारधी, बबन कुकडे, बाळाराम साठवणे, इंदुबाई कटरे, कोठीराम निशाणे, विठ्ठल बांते, डॉ. अनिल पटले , परशराम बिसेन, किशोर कुंभरे, राजू टेकाम, बालक दास कुंभरे , चंद्रशेखर मडावी, मायाबाई पडोळे, राजेश दमाहे, आशिष चौधरी, भूमीताताई जिभकाटे, नत्थू बावनकर, अजित ठवरे, सोनालीताई बुद्धे, मनीषाताई पटले, सुनीताताई पटले, आशाराम मारबते, मनोज डोंगरे, श्रीराम मल्लेवार, विनोद कुकडे, विजय कोलते, मोतीभाऊ बोदरे, गंगाधर कुकडे, महेश कुकडे, संदीप वानखेडे, हरिभाऊ कुकडे, शोभाताई मारवाडे, सविताताई वानखेडे, नंदा कुकडे, सुरेश कुकडे, चंद्रशेखर मल्लेवार, अमित समरीत, प्रवीण साठवणे, रमेश कुकडे, कृष्णा मल्लेवार, लक्ष्मण कुथे, दशरथ कुकडे धर्मराज कुकडे, कविताताई कुकडे, दिनेश पुराम, अतुल बांते, अनिताबाई बांते, अशोक पटले, हेतराम बिसेन, जयेशराम बिसेन, अहिल्याबाई टेकाम, शंकर शौयाम, जितेंद्र कोविचे, आशिष गौतम, निर्मलाबाई बिसेन, चंद्रकलाबाई बांते, ज्योती बाई मडावी, प्रकाश ठाकरे, रामशेवर चौधरी, हिराकुमार गोमासे, अर्जुन अशवले, विजय उपशे, शरदचंद्र भांडारकर, मंदाबाई कुंभरे, महेश पटले, आदेश मेश्राम, शालिकराम इनवते, मनीषा ताई उके, गणेश गौतम, छत्रपती मेश्राम, सतीश वलके, ऋषीपाल रोडगे, अरुण वलके, पुष्पाबाई नागपुरे, फुलचंद रामटेके, तेजराम कांबळी, प्रशांत धार्मिक, आशिष कोडापे, वर्षाताई रामटेके, विद्याताई सोनेवाणे, वेंकट मरघडे, अनिल बावनकर, उदाराम मरघडे, संतोष लिल्हारे, नानेस्वर धावडे, बबिताताई पाटील, अशोक मुरे, हेतराम बारेवार, नरेश भुरे, गोंडराज भैरम, प्रशांत शाखरवाडे, दीपमाला टेमभेकर, उर्मिलाताई धावडे, राजेश साठवणे, भीमराव डहाट, कामराज कुंभलकर, सुनील प्रजापती, भाऊराव बावनकर, अजय मलेवार, दिलीप गायधने, शिवशंकर कांबळी, कोमल पारधी, रोशन दमाहे, दिगंबर शेंडे, हेमंत लिचडे, नामदेव मदनकर, रत्नाकर भोंगाडे, अविनाश धावडे, भूमिलाल हरिणखेडे, अर्जुन मदनकर, योगेंद्र चौधरी, वासुदेव वैध व सर्व बूथ पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित होते.

या बैठकी प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात खासदार प्रफुल्ल पटेल जी यांच्या नेतृत्वावर व विकासात्मक दृष्टिकोन वर विश्वास ठेवून ग्राम मनोराचे सरपंच राजेश पेशने यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसोबत पक्षात प्रवेश केला. माजी आमदार राजेंद्र जैन,विजय शिवनकर व उपस्थित मान्यवरांनी सर्वाचे पक्षाचा दुपट्टा वापरुन पक्षात स्वागत केले.यावेळी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने कृष्णा मरघडे यांना ट्रायसिकल चे वापट करण्यात आले.

blank