भंडारा –जिल्ह्याच्या अंतिम टोकावर असलेल्या बपेरा जिल्हा परिषद क्षेत्रातील बपेरा पुनर्वसन गावाला माजी खासदार शिशुपाल पटले यांनी भेट दिली. यात प्रत्येक्ष पाहणी करून गावकर्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यात अत्यंत विदारक परिस्थिती समोर आली. अवघ्या १२ वर्षात राज्य शासनाने बांधून दिलेली घरे राहण्या योग्य राहिली नाहीत. पावसाळ्यात सिमेंट काँक्रीटचे सल्याप झिरपत असल्याने घरे जीर्ण होत आहेत. ही घरे केव्हाही कोसळू शकतात. त्यामुळे जीवित हानी टाळता येत नाही. यात शौचालय उपयोगी राहिलेले नाहीत. घरे, गडर, नाल्या तांत्रिक दृष्टया बनविलेले नाहीत. बर्याच लोकांना पट्टे वितरित झालेले नाहीत, अनेकांच्या घरी विजेचे कनेक्शन नाही, योग्य रस्ते नाहीत. अशा अनेक समस्या पाहावयास मिळाल्या आहेत.
या संपर्क दौर्या दरम्यान नुकत्याच झालेल्या बिसेन हत्या कांडातील तिरोडा तालुक्यातील चुरडी या गावाला सुध्दा भेट देऊन बिसेन परिवाराला सांत्वना दिली. त्यावेळी त्यांच्या सोबत भाजप युवा नेते किशोर रहांगडाले, देवानंद लांजे, बपेरा च्या सरपंचा सौ. ममताताई राऊत, डॉ. मुरलीधर बानेवार, सचिन खांगार, शोभाराम राऊत, संदीप जटाळे, दिलीप मुळे, पुरुषोत्तम उपरिकार, हिरालाल उपरिकार, परवेश भूते, सुरेंद्र उपरिकार, माजी सरपंच चेतन रहांगडाले, माजी सरपंच गुरुदेव पारधी, उपसरपंच सोहंन पारधी, निलेश डहाट, हिरालाल सहारे, अरविंद पटले, लोकेश बम्हणोटे, उमेश गजभिये, सचिन रहांगडाले, सुनील पटले तसेच बपेराचे गावकरी प्रामुख्याने उपस्थित होते.





