33.9 C
Gondiā
Monday, June 8, 2026
Home राजकीय भारत बंदच्या समर्थनात गोंदिया-गोरेगाव येथे भाकपचे निदर्शने

भारत बंदच्या समर्थनात गोंदिया-गोरेगाव येथे भाकपचे निदर्शने

0
38

blank

गोंदिया,दि.27ः तिन काळ्या कृषि कायद्याच्या विरोधात व हे कायदे रद्द करणे किमान समर्थन मुल्य (एमएसपी) कायदेशीर हमी निर्माण करण्याची मांगणी साठी मागील १० महीन्या पासुन दिल्ली च्या सिमेवर सुरू असलेले किसान आंदोलन व संयुक्त किसान मोर्चाच्या आव्हानावर २७ सप्टेंबर भारत बंद ला पाठिंबा म्हणून भारतीय कम्युनिस्ट पार्टी गोंदिया तालुका द्वारे नेहरू चौकावरून मोर्चा काढून एसडीओ कार्यालयावर निदर्शने करण्यात आली. या माध्यमातून प्रधानमंत्री व मुख्यमंत्री यांचे नावाने एसडीओ यानां शिष्टमंडळाने निवेदन सादर केले.यावेळी भाकपचे जिल्हा. कौंसिल सचिव मिलिंद गनविर,सहसचिव रामचंद्र पाटील,तालुका सचिव प्रल्हाद ऊके,राज्य कौंसिल सदस्य करूणा गनविर,नामदेव पंधरे सहभागी झाले होते.या आंदोलनाच्या मुख्य मागण्यांत दिल्ली सीमांवर सुरू असलेले किसान आंदोलनाला पाठिंबा देणे,
अदानी अंबानी धार्जीणे हुकुमशाह केंद्र सरकारच्या धोरणांचा विरोध व वाढ़ती माहंगाई ,पैट्रोल डिजेलचे वाढ़ते भाव ,मनरेगा फंड कपात,खत कीटनाशक,विजेचे भाव,वाढ़ती बेरोजगारीचा विरोध करण्यात आला.

blankगोरेगांव -27 सप्टेबंरच्या भारत  बंदमध्ये जनतेला सहभागी होण्याचे आवाहन भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य कार्यकारीणी सदस्य काॅ हौसलाल रहांगडाले यांनी केले होते.त्या आवाहनाला गोरेगाव येथे चांगला प्रतिसाद मिळाला.गोरेगावातील दुकाने,शाळा सर्व बंद ठेवण्यात आली होती.या आंदोलनात भाकपचे काॅ चरणदास भावे,काॅ कल्पना डोंगरे,कॉ परेश दुरूगवार,दुलीचद कावडे,कॉ नारायण भलावी,कॉ भोलाराम मरसकोले,काॅ चैयतराम दियेवार,काॅ गगांराम भावे,काॅ गुलाब बोपचे,काॅ बाबुलाल शहारे,काॅ बुधराम रहांगडाले,कॉ भैयालाल कटरे, काॅ भोलाराम मरसकोले सहभागी झाले होते.

blank