
तातडीने शस्त्रक्रिया करून चिमुकल्याचे जीवन केले सुकर !
८ लक्ष ५० हजार रुपयांची मोफत शस्त्रक्रिया !
मोर्शी प्रतिनिधी:मोर्शी विधानसभा मतदार संघाचे आमदार देवेंद्र भुयार वरुड मोर्शी तालुक्यातील रुग्णांचा ईलाज करण्यासाठी त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यासाठी रुग्णसेवा देण्यासाठी नेहमी तत्पर असतात, आमदार देवेंद्र भुयार यांनी ज्या गरिबांजवळ असाध्य रोगांवर उपचार करवून घेण्यासाठी पैसा नाही, ज्यांना मरणाशिवाय पर्याय नाही अशा रुग्णांना मदत करत आहे. त्यांनी आदिवासी, ग्रामीण व शहरी भागांत राहणार्या गरीब व कोणीही वाली नसलेल्या रुग्णांना स्वास्थ्य सुविधा पुरवविण्याचे काम करीत आहे.
मोर्शी येथील अमन अली उस्मान अली वय ६ वर्षे राहणार मोकासपुरा मोर्शी या चिमुकल्यावर कॉकलीअर इमप्लान्ट सर्जरी शस्त्रक्रिया करणे गरजेचे आल्यामुळे शस्त्रक्रिये करीता 8 लक्ष ५० हजार रुपये खर्च येणार असल्याचे कळताच साधारण परिस्थिती असलेल्या उस्मान अली यांच्या कुटुंबावर आभाळच कोसळले.
उस्मान अली यांनी आमदार देवेंद्र भुयार यांची भेट घेऊन आपल्या मुलाला होणाऱ्या त्रासाबद्दल व आर्थिक अडचणी बद्दल आपली व्यथा सांगताच आमदार देवेंद्र भुयार यांनी क्षणाचाही विलंब न करता अमन अली उस्मान अली या ६ वर्षीय चिमुकल्याला एच एन रिलायन्स हॉस्पिटल गिरगाव मुंबई येथे दाखल करून ८ लक्ष ५० हजार रुपये खर्च येणारी कॉकलीअर इमप्लान्ट सर्जरी मोफत करून दिल्यामुळे अमन अली उस्मान अली यांना दिलासा मिळाला आहे.
शस्त्रक्रियेनन्तर अमन अली यांच्या प्रकृतीत सुधारणा दिसून येत आहे. आमदार देवेंद्र भुयार यांच्या पुढाकाराने
रुग्णसेवक पंकज ठाकरे यांच्या सहकार्याने गरीब कुटुंबातील चिमुकल्याचे जीवन सुकर झाल्याने उस्मान अली कुटुंबियांनी आमदार देवेंद्र भुयार, यांचे आभार व्यक्त केले.





