29.8 C
Gondiā
Sunday, June 14, 2026
Home गुन्हेवार्ता रेल्वेच्या धडकेत पाच ऱानडुक्कर जागीच ठार

रेल्वेच्या धडकेत पाच ऱानडुक्कर जागीच ठार

0
117

blank

गोंदिया--जिल्ह्यातील नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पातून जाणार्या गोंदिया चंद्रपूर रेल्वेमार्गावर आज मालवाहक रेल्वेगाडीने धडक दिल्याने पाच रानडुक्कर दगावल्याची घटना आज उघडकीस आली.ही घटना सड़क/अर्जुनी तालुक्यातील गोंगले पांढरी रेल्वे स्टेशन परिसरात आज ता.२७ सप्टेंबर ला पहाटेच्या सुमारास घडली.घटनेची माहिती  वनविभागाला मिळताच वनअधिकारी यांनी घटनास्थळ गाठले,मेलेल्या ऱान डुकरांचा पंचनामा केला.य़ावेळी राउंड आंफिसर श्री.वलथरे, वनरक्षक आर.एस.शिसोदे,वनमजूर रवी वैद्ये,चुडामण पुस्तोडे,नरेश वाल्दे,बोरकर,पुस्तोडे,संजय वासनिक प्रामुख्याने हजर होते.