38.6 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home विदर्भ प्रधानमंत्री ग्राम डिजिटल साक्षरता अभियान जिल्ह्यात कागदोपत्रीच

प्रधानमंत्री ग्राम डिजिटल साक्षरता अभियान जिल्ह्यात कागदोपत्रीच

0
74

blank

गोंदिया(खेमेंद्र कटरे):  नागरिकांना डिजीटल साक्षर बनवण्ङ्मासाठी प्रधानमंत्री ग्राम डिजिटल साक्षरता अभियान (pmgdisha) ही योजना केंद्र सरकारच्यावतीने देशपातळीवर प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या   देखरेखीत ग्रामपंचायतस्तरावर राबवून डिजिटल साक्षर नागरिक घडवणे हा मुख्य उद्देश असला तरी या योजनेचा पाहिजे तसा प्रचार प्रसार आणि इमाने इतबारे राबवली न गेल्याने गावखेड्यातील अनेक नागरिकांकडे जरी एंड्राईड मोबाईल असले तरी सरकारच्या ई पीक नोंदणीच्या माध्यमातून डिजिटल साक्षरता अभियान हे संबधित केंद्रचालकांनी कागदावरच राबवल्याने प्रधानमंत्री ग्राम डिजीटल साक्षरता अभियान अपयशी ठरली अशीच म्हणण्याची वेळ आली आहे.
४ जी च्या युगात देशातील प्रत्येक व्यक्तीला संगणक व डिजिटल उपकरणें जसे टेबलेट, स्मार्टफोन इत्यादीचे प्रशिक्षण, ईमेल पाठवणे,इंटरनेटचा वापर करुन सरकारी योजनेचे लाभ घेणे,कोणत्याही प्रकारची माहिती काढ़णे व ऑनलाईन पैशाची देवाण-घेवाणासह इतर कामे डिजिटल पध्दतीने करता आली पाहिजे हा केन्द्र शासनाचा उद्देश्य आहे. या योजनेत ग्रामीण भागातील एका परिवारातून एक सदस्याला डिजीटल साक्षर बनवायचे आहे.२०१४ चा एका सर्वे नुसार आपल्या देशात फक्त ०६%टक्के ग्रामीण परिवाराकड़े संगणक आहे.त्यामुळे केंद्र सरकारने या योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील नागरिक डिजीटल साक्षर  व्हावे याकरीता ही प्रधानमंत्री ग्रामीण साक्षरता अभियान २०-२१  राबवण्यातच येत आहे. परंतु गावातील नागरिकांना एकत्रित करुन त्यांना प्रशिक्षण देऊन त्यांची परिक्षा घेतल्यानंतर उत्तीर्ण झालेल्यांना प्रमाणपत्र देणे हे काम गावपातळीवर काम दिलेल्या संगणक संस्थेला(सीएससी) देण्यात आले.मात्र गोंदिया जिल्ह्यातील अनेक गावामध्ये यासंबधीचा आढावा घेतल्यावर असे लक्षात आले की गावात अशाप्रकारचे कुठलेच प्रशिक्षण गावपातळीवर झाले नसून संस्थाचालकांनी आपल्या माध्यमातूनच प्रशिक्षण झाल्याचे दाखवून प्रमाणपत्राचे वाटप केले.
जिल्ह्यात प्रशिक्षण नावालाच
योजनेकरीता प्रत्येक ग्राम पंचायत अंतर्गत एक प्रशिक्षण केंद्र प्रधानमंत्री ग्राम डिजिटल साक्षरता अभियान या नावाने कॉमन सर्विस सेंटरद्वारे उघडायचे आहे आणि ज्याना डिजिटल देवाण-घेवाण, मेल पाठवणे,सरकारी योजना आनलाईन करता येत नाही पाहता येत नाही अशां परिवारातून एकच सदस्याची निवड करुन गावातील ३०० नागरिकांची नोंदणी  करुन त्याच ग्रामपंचायत क्षेत्रात प्रशिक्षण केंद्र उघडून त्या ३०० नागरिकाना १० दिवस पर्यंत शिकवायचे आहे.परंतु गोंदिया जिल्ह्यात ग्रामपंचायतमध्ये असे प्रशिक्षण  न घेता ज्या काही सीएससी संस्थांना केंद्र मिळाले,ते एकदा येऊन सर्वांची नोंदणी करुन परत जातात आणि 10 दिवसानंतर परिक्षेच्या नावावर कॅमेरासमोर उभे करुन पास करुन प्रमाणपत्र देत असल्याचा प्रकार उघडकीस येऊ लागला आहे.ग्राम पंचायतमध्ये प्रशिक्षण केंद्र न उघड़ता प्रशिक्षक सरळ गावातील नागरिकांच्या घरी जाऊन परिवारातून प्रत्येक सदस्यांचे रजिस्ट्रेशन करून प्रशिक्षण न देता त्यांची परीक्षा स्वतः देतात परीक्षा देणारा माणूस फक्त आणि फक्त कॅमेरासमोर बसला असतो.त्यांची परीक्षा प्रशिक्षक देतो अशा प्रमाणे जिल्ह्यात डिजीटल साक्षर बनवण्यात येत आहे.

गोरेगाव तालुक्याती झांजिया गावाकरीता सालेकसा येथील एका संस्थेला काम देण्यात आले.त्या संस्थेच्या प्रमुखांने ग्रामपंचायत कार्यालयात येऊन पहिल्या दिवशी 300 लोकांची नोंदणी आपल्या आयडीवरुन केली.त्यानंतर सरळ 10 दिवसानीच ते त्या गावात पोचल्याची माहिती गावातील नागरिकांनी दिली.तर दवडीपार येथे अद्यापही प्रशिक्षणाला सुरवात झालेली नाही.सालेकसा तालुक्यातील दरभडा येथे संस्थेची नोंदणी आहे पण प्रशिक्षण सुरु झालेले नाही.तिरोडा तालुक्यातील काचेवानी ग्रामपंचायत अंतर्गतही हे अभियान अद्यापही सुरु झालेले नाही. जिल्ह्यात १२२८ प्रशिक्षण केंद्र दाखवण्यात आले आहेत.मात्र यापैकी निम्मे प्रशिक्षण केंद्र हे फक्त कागदोपत्री असून परिक्षा केंद्रांवर कुणाची नजर नसल्यानेच हे डिजिटल साक्षरता अभियान बोगस ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही.या प्रशिक्षण केंद्रासाठी दिलेला पैसा हा जिल्हास्तरापासून तालुका व ग्रामपातळीवरील केंद्रचालकाच्या माध्यमातून ग्रामपातळीवर प्रशिक्षणावर खर्च व्हायला हवा परंतु प्रशिक्षण केंद्रच ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात सुरु होत नसल्याने तेरी भी चूप मेरी भी चूप सारखा कार्यक्रम‘ सद्या सुरु आहे.या बोगस अभियानाचा फटका आता ईपिक अहवाल नोंदणीच्या माध्यमातून समोर येत आहे.सरकारदरबारी गावपातळीवर डिजिटल साक्षरतेचे प्रमाण वाढल्याचे सरकारच्या लक्षात आल्यानेच राज्य सरकारने ई पीक नोंदणी अहवाल आँनलाईन माध्यमातून आणले आणि या नोंदणीतूनच डिजिटल साक्षरता अभियानाची पोलखोल व्हायला लागली.

  डिजिटल साक्षरता अभियानात कोन घेऊ शकतो सहभाग
ज्या कुटुंबात एकही सदस्याला डिजीटल यंत्रणा हाताळता येत नाही,संगणकाचा ज्ञान नाही अशा कुटुबंतील १४ ते ६० वयोगटातील एका सदस्याची तसेच मागास जातीतमधील लोकांची निवड करुन त्यास १० दिवसाचे प्रशिक्षण देऊन डिजिटल साक्षर करायचे आहे.या अभियानासाठी  जसे की गैर-स्मार्टफोन वापरकर्ता,अंत्योदय परिवार, कॉलेज सोड़लेले मुलांना प्राध्यान्य देण्यात आले आहे.
योजनेंतर्गत राज्यातील प्रत्येक  जिल्ह्यातील तालुक्यातील ग्राम पंचायत मध्ये एक-एक प्रधानमंत्री ग्रामीण डिजिटल साक्षरता अभियान प्रशिक्षण केंद्र असेल त्या प्रशिक्षण केंद्रात गावातील एका परिवारा‘धून एका सदस्याला कमित कमी १० दिवस प्रशिक्षण द्यायचे आहे. प्रशिक्षणानंतर २५ प्रश्न डिजीटल साक्षरतेवर विचारली जातील,त्यापैकी ७ प्रश्नांची त्तर दिलेल्या व्यक्तीला डिजीटल साक्षरतेचे प्रमाणपत्र दिले जाते.प्रधानमंत्री ग्रामीण डिजिटल साक्षरता अभियानंतर्गत प्रशिक्षण घेणार्या प्रशिकाना एक प्रशिक्षणार्थीकरीता केंद्र सरकार २९७ रूपये खर्च करतो.त्या २९७ रुपये मध्ये प्रशिक्षण केंद्राकरीता लागणारे साहित्य आणि प्रशिक्षकाचा खर्च असतो. एका प्रशिक्षण केंद्रामागे ३०० अभ्यार्थी असणे गरजेचे आहे.
जिल्ह्यात अभियान सुरु-रहागंडाले
प्रधानमंत्री ग्रामीण डिजिटल साक्षरता अभियानाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी गिरीश रहागंडाले यांना विचारणा केले असचा जिल्ह्यात अभियान सुरु असून गावपातळीवर प्रशिक्षण न होताच प्रमाणपत्र दिले जात असल्याबद्दल आपणाकडे तक्रार नाही.आपल्याकडे असल्यास सांगावे तपासणी करता येईल असे सांगितले.
तालुकानिहाङ्म प्रशिक्षण केंद्र
आमगाव तालुका-        १३५
अर्जुनी मोरगाव तालुका- ११७
देवरी तालुका-           ११०
गोंदिया तालुका-         २९२
गोरेगाव तालुका-         ११५
सडक/अर्जुनी तालुका-१३०                                                                                              सालेकसा तालुका-       १०४
तिरोड तालुका-          २२५

blank