
..भाषण व व्यक्तिमत्त्व विकास शिबिराचे उद्घाटन
अर्जुनी मोरगाव-मनुष्य कुळावरून नाही तर विचारांनी मोठा होतो.वक्तृत्व कुणाला प्रभावित करण्यासाठी नाही ते समाजाला दिशा दर्शक असावे.उत्तम भाषण देऊन पोपट होऊ नका.राष्ट्रसंतांचा विचार समाजात रुजविणारे वक्ते व्हा.वक्तृत्व मनुष्याला जगण्याचे बळ देते असे प्रतिपादन प्रशांत ठाकरे महाराज यांनी केले.
ते स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शेतकरी भवनात आयोजित भाषण व व्यक्तिमत्व विकास प्रशिक्षण शिबिरात प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.
शिवणारायन पालिवाल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या उद्घाटकीय सोहळ्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ कदम,उमाकांत ढेंगे, सोनदास गणवीर,उद्धव मेहंदळे,प्राचार्य सुनील पाउलझगडे,डॉ.महेश नाकाडे,उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमापूजन, दीपप्रज्वलन आणि माल्यार्पनाणे झाली.
ठाकरे पुढे म्हणाले,उत्तम वक्ता होण्यासाठी वक्तृत्व रसाचा अभ्यास आवश्यक आहे.वीर रस,शृंगार रस आणि करून रसाचा वापरणाने वक्तृत्व बहरते. ज्या वक्त्याला स्वतःचा माईक सेट करता येतो तो महान होतो.स्वतःच्या कमजोरीला ताकत बनवा.कामात सातत्य ठेवल्याने निश्चित यश प्राप्ती होते.समाजात राष्ट्रसंतांच्या विचारांचा दिवा घरोघरी पेटविणाऱ्या वक्त्यांची गरज असल्याचे विचार व्यक्त केले.
यावेळी सपोनि सोमनाथ कदम,उमाकांत ढेंगे, शिवनारायण पालीवाल,कृष्णकांत खोटेले यांनी मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक दुर्योधन मैंद,संचालन चौहान,आभार उद्धव मेहंदळे यांनी केले.





