33.9 C
Gondiā
Sunday, June 7, 2026
Home Top News छत्तीसगडमध्ये ४ महिला नक्षलवादी ठार

छत्तीसगडमध्ये ४ महिला नक्षलवादी ठार

0
29

blank

सुकमा, दि. २२ – छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यात रविवारी सकाळी नक्षलवादी व सुरक्षा रक्षकांमध्ये झालेल्या चकमकीत चार महिला नक्षलवादी ठार झाल्या आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुकमा जिल्ह्यातील अर्णपूर भागात स्पेशल टास्क फोर्स व केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) जवानांनी संयुक्तरित्या केलेल्या कारवाईत चार महिला नक्षलवादी ठार झाल्या. या कारवाईनंतर सुरक्षा रक्षकांकडून परिसरात शोधमोहिम राबविण्यात येत असून नक्षलवाद्यांकडून शस्त्रास्त्रांचा साठा जप्त करण्यात आला आहे.

blank