शिक्षणमंत्री विनोद तावडेंना पितृशोक

0
12
मुंबई- राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना पितृशोक झाला आहे. तावडेंचे वडील श्रीधर तावडे यांचे आज वृद्धापकाळाने निधन झाले. विलेपार्ल्यातील राहत्या घरी श्रीधर तावडेंनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यामागे त्यांच्या पत्नी विजया तावडे, मुलगी जया कदम, जावई, मुलगा विलास तावडे व मंत्री विनोद तावडे, सूना-नातवंडे असा परिवार आहे.
आज सायंकाळी त्यांच्यावर विलेपार्लेत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्याआधी विनोद तावडे यांच्या विलेपार्ल्यातील मातोश्री या निवासस्थानी श्रीधर तावडे यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेता येणार आहे