32.3 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home विदर्भ आमदार चंद्रिकापुरे व अल्पसंख्याक अध्यक्ष रफिक खान यांनी अल्पसंख्याक समाजाशी साधला संवाद

आमदार चंद्रिकापुरे व अल्पसंख्याक अध्यक्ष रफिक खान यांनी अल्पसंख्याक समाजाशी साधला संवाद

0
31

blank

अर्जुनी मोर-मोरगाव अर्जुनी येथे महागाव,केशोरी,अर्जुनी मोरच्या अल्प संख्याक समाजाची सभा घेण्यात आली.सभेला आमदार मनोहर चंद्रिकापुरे,रफिक खान जिलाअध्यक्ष रॉ.का.पा.अल्पसंख्याक गोंदिया यांनी हजर राहून  मार्गदर्शन केले.यात पारशी,शीख,इसाई,मुस्लिम,नवबौद्ध,जैन इत्यादी समाजाचा समावेश आहे.महविकास आघाडी शासनातर्फे या समजा करीता राबविण्यात येणाऱ्या विविध योजना ची माहिती खालच्या घटका पर्यंत पोहचने अनिवार्य असून,या समाजातील मुलांना चांगले उच्च शिक्षण घेता यावे त्यासाठी शिष्यवृत्ती,शैक्षणिक कर्ज,कौशल्य आधारित प्रशिक्षण,घरकुल,वाचनालय,शुद्ध पाणी,सार्वजनिक विकासाची कामे,आरोग्य सुविधा,कब्रस्थान विकास कामे,स्वयं रोजगार करीता कर्ज सोय,गरजू लोकांना रोजगार हमीची कामे,उच्च शिक्षण साठी कर्ज योजना,इत्यादी योजने बाबत मा.आमदार मनोहर चंद्रिकापूरे यांनी समजाऊन सांगितले.
रफिक खान यांनी राष्ट्रवादी पक्ष हा नेहमी शेतकरी,शेतमजूर,बेरोजगार,गोर गरीब जनतेला समजून घेऊन त्यांना मदत करणारा पक्ष असून खा. प्रफुल्ल भाई पटेल,माजी आमदार राजेंद्र जैन,आमदार चंद्रिकापुरे यांचे प्रयत्नातून किती तरी विकासाचे कामे मार्गी लागलेली आहे. आणि पुन्हा जोमाने कामे करण्याची शक्ती निर्माण करून देण्यासाठी सर्व समाजाच्या जनतेने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला एकजूट होऊन,संघटन मजबूत करण्याचे काम आपण सर्वांनी करावे असे रफिक खान यांनी याप्रसंगी सांगितले.समाजाकडून कब्रस्तान विकास कामांचे निवेदन यावेळी देण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्र संचालन उपाध्यक्ष एफ. आर. टी.शहा यांनी केले. तर प्रास्ताविक निसारभाई शेख यांनी केले,आभार इम्रानभाई शेख यांनी मानले.यावेळी एजाजुल रहिमखान,निसार अहमदखान,नियाज अहमद,फारुख शेख,राकेश जैस्वाल, बंडुभाऊ भेंडारकर,सतीश पारधी,आसिफ शेख,सय्यद युनूस, सत्तारभाई,सय्यद अनवर,आरिफ शेख,मौलाना गणीखान,हाफिज कौसर रझा, अलीम पठाण,फिरोज पठाण,इम्रान शेख,अलीम शेख,बशीर पठाण,रसूल शेख,शफी चवारे,अश्फाक चवारे,जुल्फिकार अली, अन्वरभाई,ताज शेख,आदिल शेख,अल्ताफ शेख,रफिक पठाण,शरीफ बेग,मजीद अगवान, सईद अगवान,सिराज पठाण,अफरोज शेख,सलमान शेख, निजाम खान,मुश्ताक भाई, आदि उपस्थित होते.

blank