
तिरोडा:- स्वातत्र्याच्या अमृत महोत्सावनिमीत्त घरपोच सातबारा वाटप कार्यक्रमाला महसूल विभागातर्फे महात्मा गांधी जयंतीनिमित सुरुवात करण्यात आली असून विधानसभा क्षेत्रात तिरोडा तालुक्यात चुरडी व गोरेगाव तालुक्यात सटवा या गावांपासून आमदार महोयांच्या हस्ते सात वाटपाला सुरुवात करण्यात आली यावेळी आमदार रहांगडाले यांनी इ पिक माहिती भरण्याकरिता शेतकऱ्यांना आव्हाहन केले असून आतापर्यंत शेतकऱ्यांच्या पिक पेऱ्याची नोंद ही तलाठी यांच्यामार्फत केली जात होती. प्रत्यक्ष गटात न जाता शेतकरी ज्या पिकाची नावे सांगेल त्याच पिकाचा पेरा झाला असे ग्राह्य धरुण त्याची नोंद होत असत. त्यामुळे नुकसानभरपाईच्या दरम्यान अनेक अडचणींचा सामना आधिकारी यांना करावा लागत होता. अनेक शेतकऱ्यांच्या पिकाच्या नोंदी नसतानाही शासकीय मदत लाटली जात होती. शेतकऱ्याने पेरलेल्या पिकाची अचू्क नोंद शासन दप्तरी व्हावी आणि शेतकऱ्यांनाही त्याचा फायदा व्हावा या दृष्टीने ‘ई-पीक पाहणी’ अॅप निर्माण करण्यात आले आहे. यामाध्यमातून शेतकऱ्याने कोणत्या गटामध्ये कोणते पिक घेतले आहे याची नोंद तर होणारच आहे शिवाय ते ठिकाणही अक्षांश / रेखांशमध्ये नोंद केले जाणार आहे. या अक्षांश / रेखांशमध्ये नोंद करतेवेळी नेटवर्कशी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना समस्या उदभवत असल्यामुळे बहुतांश शेतकरी आजपावेतो माहिती भरू शकले नाही याकरिता महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सहकार्य करण्याचे आदेश दिले मोफत घरपोच सातबारा कार्यक्रमाच्यावेळी प्रामुख्याने तिरोडा उपविभागीय अधिकारी अजय नष्टे, तिरोडा तहसीलदार प्रशांत घोरुडे, गोरेगाव तहसीलदार सचिन गोसावी, मंडळ अधिकारी प्रवीण रोकडे, तलाठी नरेश उगावकर चुरडी सरपंच पल्लवी भोयर, सटवा विनोद पारधी, चूरडी उपसरपंच अतिश जांभूळकर,सटवा उपसरपंच ओमप्रकाश चौधरी, सदस्य रवीशंकर मेश्राम ,एकनाथ सपाटे, रत्नमाला वणवे, मंगला धांडे, त.मु.अध्यक्ष इंद्रराज ठाकूर , पोलीस पाटील टिकाराम रहांगडाले,पूरनलाल ठाकूर तलाठी येळे कृउबास संचालक कुवरलाल कटरे, जि.प.प्रमुख रमेश ठाकूर व गावकरी उपस्थित होते.





