
अर्जुनी मोरगाव,दि.05ः तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र केशोरी येथे रुग्णसेवेकरीता मिळालेल्या नवीन रुग्णवाहिकेचे लोकार्पण आमदार मनोहर चंद्रिकापूरे यांच्या हस्ते करण्यात आले.केशोरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला आमदार मनोहरजी चंद्रिकापुरे साहेबांच्या प्रयत्नांतून नवीन रुग्णवाहिका मिळाली.आता या आरोग्य केंद्रात 2 रुग्णवाहिकांची सोय झालेली आहे.लोकार्पण सोहळ्याला योगेशभाऊ नाकडे,येशवंतजी गणवीर, हिरालालजी शेंडे,नंदकुमार गहाणे सरपंच, घनश्यामजी धामट, गजानन कोवे , अरुण मस्के ,तेजुकलाजी गहाणे, चेतन दहिकर,रविंद्र शेंडे,विकास रामटेके , युवराज गहाणे,दीपक शेंडे,अजय टेम्भुरने व अन्य वरिष्ठ मान्यवर उपस्थित होते .





