31.2 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home गुन्हेवार्ता डीसीपी सुजाता पाटील यांना अटक; एसीबीने सापळा रचून पकडलं

डीसीपी सुजाता पाटील यांना अटक; एसीबीने सापळा रचून पकडलं

0
246

blank

मुंबई | मुंबईत डीसीपी सुजता पाटील यांना एक लाख रुपयांची लाच घेतल्या आरोपात अटक करण्यात आली आहे. एसीबीने कार्यालयात सापळा रचून सुजाता यांना पकडलं आहे. या घटनेनंतर सुजाता पाटील यांची जोरदार चर्चा रंगली आहे. याआधी देखील मुख्यंमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रामुळे सुजाता पाटील चर्चेत आल्या होत्या.

मुंबईतील मेघवाडी विभागाच्या सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून सुजाता पाटील कार्यरत होत्या. यादरम्यान, एका व्यक्तीकडे पाटील यांनी 40 हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप संबंधित व्यक्तीने केला. यानंतर एसीबीने सापळा रचून सुजाता पाटील यांना अटक केली आहे.

सुजाता पाटील मागे देखील अनेक वेळा चर्चेत आल्या होत्या. मात्र सर्वात जास्त त्यांची चर्चा तेव्हा झाली जेव्हा त्यांनी त्यांच्या बदलीबाबत मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं होतं. यावेळी त्यांनी बदली करताना माझा विचार केला गेला नसून आता माझ्याकडे फक्त आत्महत्येचा आणि राजीनामा देण्याचा पर्याय राहिला असल्याचं त्यांनी पत्रात लिहिलं होतं.

दरम्यान, सांगली पोलीस कोठडीत मृत झालेल्या अनिकेत कोथळे यांच्या मुलीला सुजाता पाटील यांनी दत्तक घेतलं असून त्यांना स्वतःची तीन मुलं आहेत. मात्र त्यांच्या कुटुंबाचा मुंबई येथील खर्च आणि हिंगोलीतील त्यांच्या वाढीव खर्चामुळे त्या कर्जबाजारी झाल्या असून ते तणावाखाली नोकरी करत असल्याचं त्यांनी पत्रात म्हटलं होतं.

blank