
गोंदिया-भारतीय कम्युनिस्ट पार्टी व महाराष्ट्र राज्य किसान सभेने ११आक्टोबर ला महाराष्ट्र बंद आंदोलनाला आपला सक्रिय पाठिंबा दिला असुन या दिवसी नविन प्रशासिय इमारती समोर मोर्चा निदर्शने आंदोलनाच्या माध्यमातून एसडीओ यांना निवेदन दिले जाईल यात दिनांक ३ ऑक्टोंबर रोजी लखिमपुर खिरी (उत्तरप्रदेश) येथे शेतकऱ्यांना चिरडून त्यांना दिवसाढवळ्या क्रूरपणे मारल्याच्या घटनेमुळे संपूर्ण देश संतापला आहे व मोदी- योगी सरकार गुन्हेगा-यानां वाचविण्याचे घोर निषेधार्ह कार्य करत आहे त्याचा निषेध म्हणूण
महाराष्ट्र बंद आंदोलनाला जनतेनी पाठींबा देऊन सरकार च्या जनविरोधी,किसान विरोधी धोरणाच्या विरोधात शांतीमय बंद मध्ये शामील होण्याचे आवाहन का.प्रल्हाद ऊके ((तालुका सचिव),का.करूणा गणविर (राज्य कौंसिल सदस्य),परेश दुरूगवार,नामदेव पंधरे,जितेंद्र गजभिए,प्रकाश चौरे यांनी केले आहे.केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांना तात्काळ पदावरून बडतर्फ करण्यात यावे ,मंत्र्याचा मुलगा आशिष मिश्रा आणि त्याचा साथीदार मोनु यांच्यावर 302 खुनाचा गुन्हा दाखल होवुन ही त्यास अटक न करण्या-याचा निषेध व ताबडतोब अटक करणे,सदर घटनेचा तपास सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली एसआयटीने करावे, हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर खट्टर घटनात्मक पद धारण करताना हिंसा बळकावल्याप्रकरणी दोषी ठरवले गेले आहे त्यांना त्यांच्या पदावरून काढून टाकण्यात यावे, तिन किसान विरोधी काळे कायदे रद्द करणे व ईतर महत्वाच्या विषयांवरील महाराष्ट्र बंद गोंदिया- बंद आंदोलन यशस्वी करण्याचे आव्हान भारतीय कम्युनिस्ट पार्टी ने केले आहे.





