34.7 C
Gondiā
Sunday, June 14, 2026
Home गुन्हेवार्ता सागवान पाट्यासह दोघांना अटक

सागवान पाट्यासह दोघांना अटक

0
25

blank

सिरोंचा--रात्रीच्या सुमारास सागवान पाट्या खांद्यावर घेवून अवैधरित्या वाहतूक करीत असलेल्या दोघांना वनविभागाच्या गस्ती पथकाने ८ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री २ वाजताच्या सुमारास रंगय्यापल्ली गावातील शासकीय गोडावूनजवळ अटक केली. सुंगा पोरमा वर्से, लच्चा मासा वर्से दोघेही रा. सिरकोंडा अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
प्राप्त माहितीनुसार ८ऑक्टोबर रोजी सिरोंचा वनविभागाचे वनाधिकारी व वनकर्मचारी रंगय्यापल्ली गावात गस्तीवर होते. दरम्यान, पहाटेच्या सुमारास सुंगा वर्से व लच्चा वर्से हे दोन आरोपी शासकीय गोडावूनच्या मागून खांद्यावर सागवान पाट्याची वाहतूक करीत असल्याचे आढळून आले. आरोपींची विचारपूस केली असता, त्यांनी पळण्याचा प्रयत्न केला. मात्र वनकर्मचार्‍यांनी त्यांचा पाठलाग करुन दोघांनाही ताब्यात घेतले. अधिक चौकशी केली असता, अजून ३ व्यक्ती येत आरोपींनी सांगितले. आजुबाजूच्या परिसरात पाहणी केली असता, कुणीच आढळून आले नाही. आरोपींजवळ ४ हजार ६७0 रुपये किंमतीचे 0.0६६ घनमीटरचे दोन नग सागवान पाट्या आढळून आल्या. सदर माल जप्त करुन आरोपींना वनगुन्ह्यांतर्गत अटक करण्यात आली.
सदर कारवाई सिरोंचाचे उपवनसंरक्षक सुमीतकुमार, सहाय्यक वनसंरक्षक एस. जी. बढेकर यांच्या मार्गदर्शनात वनपरिक्षेत्र अधिकारी श्रीनिवास कटकू, पी. एम. पाझारे, कारसपल्लीचे क्षेत्र सहाय्यक आर. व्ही. जवाजी, वनरक्षक ए. एस. नैताम, डी. जी. भुरसे, रोजंदारी वनमजूर यांनी पार पाडली.