43.5 C
Gondiā
Monday, June 8, 2026
Home विदर्भ मिशन कवचकुंडल; महिलांचा सहभाग वाढला

मिशन कवचकुंडल; महिलांचा सहभाग वाढला

0
30

blank

गोंदिया, दि.12: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची दाहकता सर्व जणांनी अनुभवली आहे. आता संभावित तिसऱ्या लाटेपासून 100 टक्के सरंक्षण मिळण्यासाठी आता मिशन कवचकुंडले हे अभिनव अभियान राबविण्यात येत आहे.गोंदियात आतापर्यंत अकरा लाख लोकांचे लसीकरण करून झाले आहे. तरीही कोविड लसीकरणाच्या दुसऱ्या डोससाठी लोकांना प्रवृत्त करावे लागत आहे.

आरोग्य विभागाचे अतिरिक्त प्रधान सचिव डॉ.प्रदीप व्यास यांच्या नेतृत्वात आता कोविड लसीकरण मोहीम मिशन मोडवर राबविण्यात येत आहे. त्यामुळे आरोग्य विभागाबरोबरच सर्व शासकीय यंत्रणेचादेखील या मिशन कवचकुंडलेमध्ये समावेश करण्यात आला आहे.

मिशन कवचकुंडले अभियानानिमित्त नुकताच एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यात निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.सुवर्णा हुबेकर, साथरोग अधिकारी डॉ.सुशांकी कापसे, गोंदिया विधानसभेचे आमदार विनोद अग्रवाल यांच्या सौभाग्यवती सविता अग्रवाल, राष्ट्रीय सेवा योजनेच्या डॉ.कविता राजभोज, समुपदेशिका स्वाती बंसोड, नर्सिंग ऑफिसर रुपाली टोने आदी उपस्थित होत्या.या वेळी सविता अग्रवाल यांनी मिशन कवचकुंडले मध्ये महिलांनी उत्स्फूर्तपणे लसीकरण करून घ्यावे असे आवाहन केले. याप्रसंगी डॉ.सुवर्णा हुबेकर म्हणाल्या, संपूर्ण महाराष्ट्रात गोंदिया सुरुवातीपासूनच लसीकरणात एक नंबर आहे. त्यामुळे आता उरलेल्या लाभार्थ्यांना दुसरा डोसला विलंब न करता कवचकुंडले मिशनमध्ये तो टोचून घ्यावा. मिशन कवचकुंडलेमध्ये राष्ट्रीय सेवा योजनेचे विदयार्थी सुद्धा लोकांना लसीकरण बूथपर्यंत आणण्यासाठी मदत करीत आहेत, अशी माहिती डॉ.कविता राजभोज यांनी दिली.

मिशन कवचकुंडले हे अभियान जिल्हाधिकारी डॉ.नयना गुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली 8 ऑक्टोबर ते 14 ऑक्टोबर दरम्यान गोंदियात आदिवासी पाड्यापासून ते शहरात राबविण्यात येत आहे.या मिशन कवचकुंडले अभियानात विशेष म्हणजे 18 वर्षेवरील वयोगटातील तरुणीचा उत्स्फूर्त सहभाग दिसून येत आहे. लसीकरण बूथवरही महिलांची संख्या जास्त दिसून येत आहे. महिला आपल्या व कुटुंबाच्या आरोग्यासाठी सजग असल्याचे समजते.

blank