38.8 C
Gondiā
Monday, June 8, 2026
Home यशोगाथा ‘गोट बँक’ महिला विकासाची ‘गोड बँक’

‘गोट बँक’ महिला विकासाची ‘गोड बँक’

0
43

blank

 मुंबई,१२ ऑक्टोबर- “शेती करता करता जोडधंदा म्हणून आम्ही शेळी पालनाची सूरुवात केली. आज माझ्याकडे ३ शेळ्या आहेत. मिळालेल्या एका शेळीने दोन पिल्ल दिली आहेत,तेही मोठी झाली आहेत. त्यातून मला ३०,००० हजार रूपये मिळू शकतील आणि सोबतच शेळींच्या लेंड्यांपासून शेताकरीता खत मिळत. त्यामुळे वर्षापूर्वी चालू केलल या शेळीपालनाचा ‘माविम’ मुळे आज आम्हाला फायदा होत आहे. काही वर्षातच या व्यवसायामुळे आम्ही सर्व महिला  आर्थिक दृष्ट्या सक्षम होऊच. त्याचा आनंद आहे”
डोळ्यात काहीस पाणी आणून मोठ्या आत्मविश्वासाने संगिता भानुदास घाटोडे सांगत होत्या.  माविम मुळे संसाराला मिळालेल्या  हातभाराबद्दल त्या भरभरून बोलत होत्या.
नविन सुकोडा ता. जि. अकोला या गावात
शेतमजूरी करुन उदरनिर्वाह  करणारे घाटोडे कुटूंब…घरात खाणारी सहा माणस.. परीस्थिती एकदम बेताची…अतिशय सर्व सामान्य.. भानुदास घाटोडे आपल्या कुटुंबाचा गाडा चालवण्यासाठी शेतमजुरी, हातमजुरी करत. मिळेल ते काम करत.. नाहीतर रस्त्यावर भाजी विकून घर सांभाळायचे…त्यात संपूर्ण कुटुंबाच भागत नव्हत. पण दुसरा काहीच पर्याय नव्हता. पत्नी संगिता भानुदास घाटोडे हीच शिक्षण  दहावी पर्यंत होतं. ह्याना स्वत: कष्ट करून आपल्या कुटूंबाला हातभार  लावायचा होता  स्वत: सक्षम व्हायच आहे. पण मोलमजुरी शिवाय काहीच मार्ग सापडत नव्हता. त्याच वेळी ‘महिला आर्थिक विकास मंडळाने’  संगीता यांना मदतीचा हात दिला,  त्या माविमच्या बैठकीत सहभागी झाल्या होत्या. तेव्हा त्यांनी काहीतरी जोडधंदा करायची इच्छा बोलून दाखवली. महिला आर्थिक विकास मंडळातून दिलेल्या अर्थसहाय्यातून त्यांनी शेळी विकत घेतली. माविममुळेच शेळी पालन करायाची सुरूवात केली. सुकोडा हे गाव अकोला शहरापासून ६ किलोमीटर दूर वसलेले असून गावाची लोकसंख्या जेमतेम १५०० ते २००० आहे.  गाव शहरामांतर्गत च्या जवळ असल्याने शेती आणि बिगर शेतीवर आधारित अशी दोन्ही कामं  लोकं करतात  पण  काम करूनही परिस्थिती तशी बेताचीच. दोन वेळ जेवण मिळेल का याचीसुद्धा शाश्वती नाही. हे असले दिवस चालू असतानाच २०१९ च्या मार्च महिन्यात  लोक संचालित साधन केंद्र, अकोला यांनी आमच्या गावात एस एच जी स्थापनेचे काम सुरु केले. ह्या उपक्रमाअंतर्गत गावात ६ गटांची स्थापना केली आणि ह्यात ६८ महिलांचा समावेश करण्यात आला. “आमची गटातील पत व्यवहार अतिशय रोख चोख आणि चांगला असल्याने आणि माझी परिस्थिती नाजूक असल्याने व शेळीपालन व्यवसाय करण्याची माझी इच्छा असल्यामुळे माझी व माझ्या गावातील21 महिलांची निवड करण्यात आली..  गोट बँक ऑफ कारखेडा यांसोबत सी एम आर सी अकोला ने  ऑक्टोबर २०२० मध्ये “स्त्रीधन शेळी पालन योजना”या योजनेच्या माध्यमातून   आम्हाला प्रत्येकीला एक शेळी हि ४० महिन्याच्या करार कालावधी करीत मिळाली. तसेच ह्या करार कालावधीत शेळीचे ४ वेतातील 4 पिल्ले गोट बँकेला परत केल्यावर शेळी व शेळीने होणारे संपूर्ण उत्पन्न आमच्या मालकीचे होते. तसेच काही कारणास्तव जर शेळीचा नैसर्गिक मृत्यू झाला तरी आमचे त्यात कोणतेही आर्थिक नुकसान होत नाही. आणि आम्हाला फक्त रू1100/- नोंदणी फी व विम्याची रक्कम म्हणून एकदाच द्यावी लागली. ह्याबरोबरच एस एच जी मधील आमची सखी “संगीता भानुदास घोटाळे” यांची पशु सखी म्हणून निवड करण्यात आली. खरं सांगायचं तर हि योजना माझ्यासाठी देवासारखी पाठीशी उभी राहिली आणि ह्यामुळेच आमचे सुगीचे दिवस आज आम्हाला पहाया मिळत आहेत.असे महिला सांगतात. आज गावात २१ महिलांना शेळ्यांचा वाटप झाला असून ह्या शेळ्यांची आज २६ पिल्ले आहेत. योजनेच्या अंतिम टप्यात जर बगितले तर 40 हजाराच्या मूळ शेळ्या आमच्याकडे तर राहतीलच तसेच 4 पिल्ले गोटबँकेला देऊनही आम्ही लाखाच्या घरात नक्की खेळणार आहोत.आणि म्हणतात ना की शेळी ही गरीबाची एटीएम आहे . गरजेचा मोठा आधार आहे.ते साकार होत आहे.ह्या शेळ्या आमच्या घरातील एक सदस्य आहेत आणि आम्ही सर्वच शेळ्यांना आमच्या मुलांसारखे जपतो,असे एक महिला सांगतात. हा लोकोपयोगी उपक्रम राबवून कोरोनाकाळात आम्हाला शेळींमार्फत स्त्री धन मिळवून दिले याकरिता  मंत्री यशोमती ताई,,माविम अध्यक्षांचे ,सचिव मॅडमचे, मुख्यालय आणि जिल्हा कार्यालय अकोला आणि गोटबँक सी एम आर सी चे आभार मानावे तेवढे कमीच असणार आहे. माविमच्या माध्यमातून  प्रत्येकी १ बकरी ११०० रुपयात महिलांना देण्यात आली. शिवाय या शेळीचा विमाही उतरवून देण्यात आला.  गावातील एका महिलेची बकरी दगावली होती. तीला  गोट बँकेतून माविम तर्फे दुसरी बकरी देण्यात आली. अशा  २२ बकऱ्या नवीन सुकोडा गावात  देण्यात आल्या आहेत.  त्यामुळे ह्या महिला शेतीची कामे करत आपल्या पायावर उभ्या राहिल्या आहेत. शेळी कशी सुदृढ राहील,तिला खायला घालण्यापासून ते त्यांच्या डॉक्टर, गोळ्या यांची काळजी घेत असतात. २०२० मध्ये म्हणजे वर्षभरापुर्वीच माविमने गोट बँक ची सुरूवात केली आहे.. राज्यातील विविध जिल्ह्यातील होतकरू महिलांना या गोट बँकेचा फायदा होतो आहे. आपल्या पायावर उभे राहण्यासाठी, कुटुंबाला आर्थिक मदत करण्यासाठी, शेळीपालनाचा हा जोड धंदा अत्यंत उपयुक्त ठरतो आहे, याचेच समाधान गोट बँकेतून शेळीपालनासाठी आर्थिक मदत घेऊन व्यवसाय सुरू केलेल्या महिलांच्या चेहऱ्यावर दिसते.  हा महाराष्ट्रातील पहिला प्रयोग माविम अकोला,पालघर व अमरावती मध्ये करण्याचे ठरले असून अकोला जिल्ह्यात ऑक्टोंबर २०२० पासून प्रत्यक्ष अमलात आला.दोन्ही  सी एम आर सी मधील ७३ महिलांना आतापर्यंत या योजनेचा लाभ देण्यात आला आहे.

blank