38.6 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home विदर्भ श्री संत चरणदास महाराजांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त स्वच्छता अभियान

श्री संत चरणदास महाराजांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त स्वच्छता अभियान

0
47

blank

गोरेगांव,दि.12ः– वैराग्यशील संत चरणदास महाराज यांच्या पुण्यस्मरण दिना निमित्त गोरेगांव तालुक्यातील मोहाडी येथे आज 12 ऑक्टोबंरला गांवात ग्रांम स्वच्छता अभियान राबवून गोंदिया-भंडारा 209 प्रबोधनकार, कथाकार, संगीतकार व अखिल भारतीय गुरूदेव सेवा मंडळाद्वारे गावात स्वच्छता अभियान राबवून प्रभातफेरी काढण्यात आली.
बाजार चौक मोहाडी येथे ग्रांमगीताचार्य जिल्हा प्रचारक गुणीलाल बघेले यांच्या अध्यक्षेत कार्यक्रमाला सुरूवात करण्यात आली.यावेळी मंचावर चंद्रपुर जिल्हा सेवाधिकारी अ.भा.श्री गुरूदेव सेवा मंडळ मोझरीचे प्रचारक प्रथा रूपलाल कावडे,टोलीराम बघेले केंन्द्रप्रचारक,जी.एफ,बघेले गीताचार्य, कथावाचक हभप निर्मलदास सोनवाने महाराज,मोहाडीचे सरंपच रजनीताई धपाडे,माजी सरंपच धुर्वराज पटले, माजी सरंपच नरेंद्रकुमार चौरागडे,श्रीराम मंदिर देवस्थानचे अध्यक्ष श्रीराम पारधी, सेवानिवृत्त मुख्याध्यापक जे.जे.पटले,माजी जि.प.सदस्य जगदीश येरोला, सेवानिवृत्त शिक्षक वाय.एफ.पटले, सेवानिवृत्त पोस्टमास्टर हिरालाल महाजन,जैपाल भोयर,प्रभुदास बघेले, बाबुलाल चौव्हाण,विवेकदास  बिर्सीफाटा, प्रेमलाल उके,टेंभरेजी केंन्द्रप्रचारक,प्रल्हाद सोनवाने,सुभाष खरोले आदी गणमान्य अतिथी उपस्थित होते.
संत चरणदास महाराज यांचे जन्म मोहाडी येथे झाले, त्यांनी आपल्या जीवनकाळात मांडोदेवी भुमीवर कित्येक वर्ष तपश्या केली आहे.ते आजन्म अविहीत होते,त्यानी साधना करून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज,संत कैकाडी महाराजांचे विचार गांवोगावी पोहचविले असे महान संत चरणदास महाराजांचा आज पुण्यस्मरण दिन साजरा करण्यात आला.
त्याच्या जीवनचरित्रवर सखोल मार्गदर्शन गुणीलाल बघेले व प्रा रूपलाल कावडे यानी सादर केले.काल्याचे किर्तन व श्रध्दांजली कार्यक्रम हभप निर्मलदास सोनवाने महाराज यांनी किर्तनाच्या माध्यमातुन श्री संत चरणदास महाराज यांचे जीवनचरित्रवर किर्तन केले.कार्यक्रमाचे संचालन व आभार योगेन्द्र बिसेन यांनी केले. यावेळी गांवातील नागरिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

blank