
सालेकसा,दि.20ः- तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची कार्यकर्ता बैठक गोपाल तिराले यांचे निवासस्थान सालेकसा येथे माजी आमदार राजेंद्र जैन, आमदार मनोहर चंद्रीकापुरे व जिल्हाध्यक्ष विजय शिवनकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली.या प्रसंगी तालुक्यातील कार्यकर्ता व पदाधिकारी यांनी स्थानिक विविध समस्यांवर सविस्तर चर्चा केली. या बैठकीला राजेंद्र जैन संबोधतांना म्हणाले की,खासदार प्रफुल पटेल यांच्या प्रयत्नाने तालुक्यातील बेवारटोला, मालाधर, कुवाढास धरण व गावतलावांची दुरुस्ती करून सालेकसा तालुक्याला सिंचनाचे साधन उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न करण्यात येईल, तसेच जिल्हा वार्षिक नियोजनातुन जास्तीत जास्त निधी या तालुक्याला उपलब्ध करून दिले जाईल. शेतकर्यांना धानाचे बोनस देणे, कोरोणा काळात आँक्सीजन, रेमडेशिविर इंजेक्शन व आवश्यक औषधांचा साठा पटेल यांच्या प्रयत्नांमुळे उपलब्ध झाला. आगामी निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला साथ देत विकासाला चालना द्या. यावेळी आमदार मनोहर चंद्रीकापुरे व जिल्हाध्यक्ष विजय शिवनकर यांनी विचार व्यक्त केले. सालेकसा सारख्या मागास भागाला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी खासदार प्रफुल पटेल यांच्या प्रयत्नांना या भागातील जनतेची साथ हवी आहे. या भागातील छोटे – मोठे कामे डीपीडीसी व पटेलांच्या माध्यमातून पुर्ण करु त्यासाठी आपण आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून द्यावे. पक्षाचे संगठन प्रत्येक गावात बुथ कमेटीचे गठन करुन पक्ष मजबूत करा. बैठकीला सर्वश्री माजी आमदार राजेन्द्र जैन, आमदार मनोहर चन्द्रिकापुरे, जिल्हाध्यक्ष विजय शिवनकर, नरेश माहेश्वरी, देवेन्द्रनाथ चौबे, गोपाल तिराले, दौलत अग्रवाल, दूर्गाताई तिराले, रेखाताई ओकटे, रोहित बनोटे, सावित्री पटले, राजेश कनोजे, संतोष रहांगडाले, बिसराम चर्ज़े, पुष्पलता वरखडे, भरतभाऊ बहेकार, सुंदरलाल काटेगा, द्ववाजी मडावी, बाबूराव हुमने, संतोष बाबा, निकेश गाड़व, ओमप्रकाश उपराडे, सेवकराम भलावी, सुखदास बरसाना, प्रकाश राउत, सुभाष बहेकार, निशा बहेकार, रंभाबाई वाढ़वे, डेमेंद्र बघेले, गीता चौधरी, ललिता ऊके, रेखा मेहर, बारेलाल वरखडे, ग्यानी साखरे, मोहन कुंभरे, मनिकराम कुंजाम, गंजु मडावी, आशा फुंडे, गुणेश्वरी फुंडे, मायाबाई बघेले, सुनीता फरदे, हरिचंद मडावी, गेंदलाल कामटकर, अनिता टेकाम, छाया बोरकर, कवल दसरिया व अन्य कार्यकर्ता उपस्थित होते.





