38.6 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home विदर्भ श्री संत नामदेव महाराज जयंती सोहळा

श्री संत नामदेव महाराज जयंती सोहळा

0
40

blank

चंद्रपूर दि. २६:: बालाजी वॉर्डातील श्री संत नामदेव महाराज स्मृती मंदिर येथे श्री संत नामदेव महाराज जयंती सोहळा पार पडला.
या निमित्त सकाळी महाराजांच्या मूर्तीचा अभिषेक करण्यात आला व त्यानंतर मंदिराकडे जाण्याचा मार्ग या फलकाचे बालाजी मंदिरातील चौकात सर्व समाज बांधवाच्या उपस्थितीत अनावरण करण्यात आले.
त्यानंतर दुपारी श्री गुरुदेव सेवा बाल भजन मंडळाद्वारे बालकांकडून उत्कृष्ट भजनाचे सादरीकरण करण्यात आले.
त्यानंतर सप्तखंजरीवादक सत्यपाल महाराजांचे शिष्य उदयपाल वाढई वणीकर यांच्या सप्तखंजरी वादन व ‘उदयपालकी उपदेशवाणी’ या प्रबोधनपर किर्तन कार्यक्रम सादर करण्यात आला. याला चांगल्याप्रकारे सर्व समाज बांधवांनी प्रतिसाद दिला. या कार्यक्रमातच २५ डिसेंबरला घेण्यात येणार्‍या वार्षिक स्नेहमिलन व आनंद मेळाव्याच्या कार्यक्रमाची घोषणा करण्यात आली.

blank