एसटीची मध्यरात्रीपासून १0 टक्के दरवाढ मागे

0
5

गोदिया दि. २६::  ऐन दिवाळीच्या तोंडावर प्रवासी भाड्यात १0 टक्के दरवाढ करून महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने (एसटी)सर्वसामान्य प्रवाशांच्या खिशावरील ताण वाढविला होता. परंतु दिवाळी आटोपल्यानंतर २६ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून १0 टक्के दरवाढ मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रवाशांनी आनंद व्यक्त केला आहे. दिवाळीच्या दोन दिवसांपूर्वी एसटी महामंडळाने प्रवासी भाड्यात १0 टक्के वाढ केल्यामुळे प्रवाशांनी रोष व्यक्त केला होता. महामंडळाच्या या निर्णयामुळे प्रत्येक प्रवाशाच्या खिशाला जवळपास ४0 ते ६0 रुपयांचा ताण पडला होता. ऐनदिवाळीत ही दरवाढ झाल्यामुळे खासगी ट्रॅव्हल्सच्या संचालकांनीही आपले दर वाढविले होते. परंतु ही दरवाढ महामंडळाने ५ ते २५ नोव्हेंबर या कालावधीसाठी केली होती. त्यानंतर २६ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून एसटी महामंडळाने १0 टक्के दरवाढ मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. महामंडळाच्या या निर्णयामुळे प्रवाशांमध्ये आनंदाची लाट पसरली आहे.

नागपूरपासून प्रमुख शहरासाठी तिकीट दर

गावाचे नाव पूर्वीचे भाडे आताचे भाडे
यवतमाळ १७४ रुपये १५५ रुपये
चंद्रपूर १८१ रुपये १६४ रुपये
गोंदिया १९५ रुपये १७६ रुपये
अमरावती १८१ रुपये १६४ रुपये
अकोला २९२ रुपये २६५ रुपये
बुलढाणा ४१७ रुपये ३७८ रुपये
औरंगाबाद ५९१ रुपये ५४२ रुपये
नांदेड ४३८ रुपये ३९६ रुपये
पुणे १२२८ रुपये १0६६ रुपये