35.7 C
Gondiā
Tuesday, June 9, 2026
Home विदर्भ तहसीलदार, नायब तहसीलदार, मंडल अधिकारी, तलाठी व लिपिकही निलंबित

तहसीलदार, नायब तहसीलदार, मंडल अधिकारी, तलाठी व लिपिकही निलंबित

0
552

blank

नागपूर : नुकत्याच जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुका पार पडल्या. यात हिंगणा तालुक्यातील डीगडोह-इसासनी जिल्हा परिषद क्षेत्रातील मतदान केंद्रावर मतदार यादीमधून मतदारांची नावे गहाळ झाली, असा आरोप वंचित बहुजन आघाडीने केला. या आरोपाची गांभिर्याने दाखल घेवून राज्य निवडणूक आयोगाने संबंधित तहसीलदार व नायब तहसीलदार यांना तात्काळ निलंबित करण्याचे आदेश विभागीय आयुक्तांना दिले आहे. याच प्रकरणात मंडळ अधिकारी, तलाठी व लिपिक यांनाही ताबडतोब निलंबित करण्यात यावे, असे आदेश दिल्याचे जिल्हाधिकारी विमला आर. यांनी सांगितले आहे.

जिल्हा परिषद पोटनिवडणुकीच्या वेळी डीगडोह-इसासनी सर्कलमध्ये मतदार यादीमधून अनेक नावे गायब झाली होती. नागरिकांनी मतदानादरम्यान गोंधळही घातला होता. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीने निवडणूक रद्द करण्याची मागणी केली होती. निवडणूक आयोगाचे साची किरण कुरूंदकर यांनी या प्रकरणाची गांभिर्याने दाखल घेतली. तसेच हिंगणाचे तहसीलदार संतोष खांडरे, नायब तहसीलदार संध्या घोडे यांना निलंबित करण्याचे आदेश जारी केले. तहसीलदारांना निलंबित करण्याचे अधिकार विभागीय आयुक्त यांच्याकडे असल्यामुळे हे प्रकरण त्यांच्याकडे असल्याचे जिल्हाधिकारी विमला आर. यांचे म्हणणे आहे.पोटनिवडणुकांदरम्यान डीगडोह-इसासनी येथील मतदार केंद्रावर मतदान यंत्रे उपलब्ध नव्हती. त्यामुळे संबंधित मतदारांना त्यांच्या अधिकारांपासून वंचित राहावे लागले. 2494 मतदारांची नावे अंतिम यादीमध्ये समाविष्ट नव्हती. हिंगणा कार्यालयाकडूननियंत्रण चार्टमध्ये विधानसभेचा भाग क्रमांक 282 व 283 समाविष्ट समाविष्ट न केल्यामुळे हे मतदार मतदानापासून वंचित राहिले. घटनेच्या तपासामध्ये संबंधित अधिकारी-कर्मचार्‍यांनी मसुदा, अंतिम मतदार यादी लोकप्रिय होण्यापूर्वी योग्य काळजी घेतली नाही. असे निरीक्षण राज्य निवडणूक आयोगाने नोंदवले. त्यामुळे संबंधिताना निलंबित करून त्यांच्याविरोधात विभागीय चौकशी करण्याचे आदेशही देण्यात आले.

blank