
अर्जुनी मोर. :– स्थानिक शिवप्रसाद सदानंद जायस्वाल महाविद्यालयात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकरीता आरोग्य उपकेंद्र अर्जुनी-मोर अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र कोरंबीटोला च्या वतीने लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली. मागील दोन वर्षापासून महाविद्यालयात प्रत्यक्ष शिक्षण बंद असल्यामुळे विद्यार्थी ऑनलाइन पद्धतीने शिक्षण घेत होते. परंतु महाराष्ट्रात कोरोणाचा प्रादुर्भाव बऱ्याच प्रमाणात कमी झाल्यामुळे 20 ऑक्टोबर 2021 पासून राज्यातील वरिष्ठ महाविद्यालय प्रत्यक्ष सुरू करण्यात आली. ज्या विद्यार्थ्यांनी दोन डोज घेतलेले नाही अशा विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष वर्गात उपस्थित राहण्याची परवानगी नाही, हे लक्षात घेऊन महाविद्यालयाचे कार्यकारी प्राचार्य डॉ. अश्विन चंदेल व राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. एम.आर. दरवे,डॉ.पी. आर. भानसे यांच्या पुढाकाराने व शासनाच्या दिशा निर्देशानुसार 25 ऑक्टोबर 2021 पासून ते 2 नोव्हेंबर 2021 पर्यंत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकरीता विशेष लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली. यामध्ये पीएच.सी. उपकेंद्राचे आरोग्य सेविका कु. एल.आर.मुनेश्वर, कु.एस.डी. भैसारे, एन.जी.राठोड,आशा सेविका कांचन लांजेवार, मंगला शहारे, मदतनीस विना सुरपाम, सुनिता पठारे व राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक मेघा जांभूळकर,अंजली दहिवले, स्नेहा बडोले, सेजल गहाणे, श्वेता बोरकर, ईदू शेंडे, शितल चंदेल , आयक्यूएसी समन्वयक डॉ. पालीवाल, डॉ. मीनाक्षी तडस, प्रा. अजय राऊत,तवाडे मॅडम, वासनिक मॅडम व महाविद्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांनी लसीकरण मोहीम यशस्वी होण्यासाठी सहकार्य केले.





