34.8 C
Gondiā
Monday, June 8, 2026
Home Top News चिमुकल्या बहीण-भावाचा तलावाच्या पाण्यात बुडून मृत्यू

चिमुकल्या बहीण-भावाचा तलावाच्या पाण्यात बुडून मृत्यू

0
57

blank

तिरोडा, दि.30 : दवनीवाडा पोलीस ठाण्यांतर्गत येणार्‍या व तिरोडा तालुक्याच्या ग्राम परसवाडा येथील दोन चिमुकले बहीण-भाऊ खेळत होते. सायकलचे टायर खेळता-खेळता गावालगत असलेल्या जिल्हा परिषद शाळेच्या मागील तलावाकडे गेले. त्या तलावाच्या पाण्यात बुडून दोन्ही चिमुकल्या चुलत बहीण-भावाचा मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना  शुक्रवार, 29 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 4 ते 5 वाजताच्या दरम्यान घडली. मुलगी निशा जितेंद्र उईके (वय 5) व मुलगा आयुष राजेंद्र उईके (वय 3) रा. परसवाडा असे मृत बहीण-भावाचे नाव आहे.

सविस्तर वृत्त असे की, गावात धान कापणीचे हंगाम सुरू आहे. घरातील सर्व कुंटुब धान कापणीसाठी शेतावर गेले होते. आई-वडील दोन्ही शेतात होते. घरी आजोबा असताना मुले अंगणात खेळत होती. खेळता-खेळता दोन्ही बहीण-भाऊ गावालगत असलेल्या तलावाकडे गेले.दोन्ही चिमुकले टायर खेळत होते. उतार भाग असल्यामुळे टायर सरळ तलावाच्या पाण्यात गेले. टायर काढण्यासाठी मुलगी पाण्यात गेली. तिच्या पाठोपाठ मुलगासुद्धा पाण्यात गेला. समज नसल्यामुळे दोन्ही चिमुकले तलावाच्या पाण्यात बुडाले.

दोन्ही बालके घरी नसल्यामुळे कुटुंबातील लोकांनी इकडे-तिकडे विचारफूस केली. गावातील इसमाने सांगितले की, ते तलावाकडे जाताना दिसले. त्यामुळे तलावाकडे जावून शोध घेण्यात आला. तेथे तलावाजवळ बालके खेळत असलेले टायर दिसले. त्यामुळे चिमुकल्यांची ओळख पटली. त्यानंतर दोन्ही बालकांचे मृतदेह आढळले.

पोलीस पाटील राऊत यांनी दवनीवाडा पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलीस निरीक्षक भोसले आपल्या ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून दोन्ही मृतदेहांना उत्तरीय तपासणीसाठी तिरोडा उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले. शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटुबांना सोपविण्यात आले.सदर घटनेबाबत मर्ग नोंद पोलीस हवालदार देवराम खडांते यांनी केली. पुढील तपास बिट अंमलदार कल्पेश चौव्हाण करीत आहे. या दुर्दैवी घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे.

blank