35.8 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home विदर्भ स्वत:चा आनंद स्वत:मध्ये शोधणे हाच खरा जीवनाचा आनंद-प्राचार्य अनिलकुमार मंत्री

स्वत:चा आनंद स्वत:मध्ये शोधणे हाच खरा जीवनाचा आनंद-प्राचार्य अनिलकुमार मंत्री

0
27

blank

सहित्यनिष्ठ व कलाप्रेमी संजय कुमार बंगळे यांचा सेवापुर्ती सत्कार सोहळा संपन्न

अर्जुनी मोर.-स्थानिक अर्जुनी मोर येथील सरस्वती विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय येथे ३२ वर्षे ४ महिने सेवा देणारे सेवापूर्ती साहित्य निष्ठ कलाप्रेमी , पत्रकार व शिक्षक संजय कुमार बंगळे यांचा आज दि २९ तारखेला सेवापूर्ती सत्कार सोहळ्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.त्यावेळी कार्यक्रमाला प्रमुख्याने प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे अध्यक्ष वल्लभदासजी भुतडा कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संस्थेचे सचिव तथा प्राचार्य अनिलकुमार मंत्री,वीणा नानोटी प्राचार्या सरस्वती ज्ञानदीप कॉन्वेन्ट,पर्यवेक्षीका छाया घाटे, पर्यवेक्षक मुकेश शेंडे,अमर मांडवगणे,रश्मी बंगळे ,प्रितिश बंगळे उपस्थीत होते.कार्यक्रमाच्या प्रारंभी विद्येची अरद्या दैवत माता सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.त्यानंतर उपस्थीत शिक्षकांच्या शुभेछ्या घेण्यात आले त्यामध्ये संजय मोरे,सुजित जक्कुलवार,जुगलकिशोर राठी यांनी शुभेछा दिल्या.नंतर विणा नानोटी यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले त्यांनी म्हटले की माणसाने माणसाशी जुडलेले नाते टिकवने हे सर्वात अवघड कार्य आहे आणि हे नाते ज्यानी टिकवले तोच खरा मानवधर्म त्यामध्येच उपस्थीत अध्यक्ष अनिलकुमार मंत्री यांनी आपल्या मनोगतात संगीतले की माणसाला सेवानिवृत्त झाल्यानंतर जीवनाचा खरा आस्वाद घ्यायचा असेल तर स्वत:चा आनंद हा स्वत:मध्येच शोधावा लागतो आणि हाच खरा जीवनाचा आनंद असतो असे प्रतिपादन अनिलकुमार मंत्री यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले.सत्कारमुर्ती संजय बंगळे यांनी आपल्या स्वरचीत विविध कवितेतून व आपल्या साहित्यातून त्यांनी केलेल्या कार्याचा आढावा आपल्या आभारातून सांगीतले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक तसेच शिक्षकेत्तर कर्मचा-यानी केले कार्यक्रमाचे संचालन व आभार अर्चना गुरनुले यांनी मानले.

blank