36.6 C
Gondiā
Tuesday, June 9, 2026
Home विदर्भ वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू

वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू

0
105

blank

 साकोली-भरधाव वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना शुक्र वारी रात्रीच्या सुमारास सानगडी ते नवेगावबांध रस्त्यावर घडली.
सदर बिबट मादी असून वय अंदाजे ५ ते ६ महिने आहे. शनिवारच्या रात्री सानगडी ते नवेगावबांध मार्गावर रस्ता ओलांडत असताना भरधाव असलेल्या अज्ञात वाहनाने बिबट्याला धडक दिल्याने त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच साकोलीचे सहाय्यक वनसंरक्षक रोशन राठोड, वनपाल राजकुमार साखरे, सुनील खांडेकर, उके, नितेश कंगाली, शेंडे, हाके, आरीकर, नंदेश्‍वर,संदिप भुसारी, चंदु सार्वे वनरक्षक, कुरसुंगे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. त्यानंतर शनिवारी सकाळी विश्री येथील रोपवाटिकेत त्याला जाळण्यात आले.

blank