33.1 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home विदर्भ जिल्हा परिषद, पंचायत समिती आरक्षण सोडत कार्यक्रम जाहिर

जिल्हा परिषद, पंचायत समिती आरक्षण सोडत कार्यक्रम जाहिर

0
423

blank

गोंदिया,दि.9 : गोंदिया व भंडारा जिल्हा परिषद व त्याअंतर्गत 15
पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी सुधारित आरक्षण सोडत
कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने घोषित केला असून त्यानुसार 10 नोव्हेंबर
2021 ते   15 नोव्हेंबर 2021 या दरम्यान आरक्षण सोडत प्रक्रिया पार पाडली
जाणार आहे.

10 नोव्हेंबर 2021 रोजी नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग तसेच महिला
(नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग व सर्वसाधारण) आरक्षण सोडतीची सूचना
प्रसिध्द करणे, 12 नोव्हेंबर 2021 रोजी नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग
तसेच महिला (मागासवर्ग प्रवर्ग व सर्वसाधारण) आरक्षण सोडत काढणे, जिल्हा
परिषद निवडणूक विभागासाठी जिल्हाधिकारी यांचे स्तरावर तर पंचायत समिती
निर्वाचक गणासाठी संबंधीत तहसिलदार यांचे स्तरावर कार्यवाही करण्यात
येणार आहे. 15 नोव्हेंबर 2021 रोजी जिल्हाधिकारी अंतिम आरक्षण शासन
राजपत्रात प्रसिध्द करतील. असे राज्य निवडणूक आयोगाने कळविले आहे.

blank