
देवरी,दि.12: देवरी पोलीस ठाणे क्षेत्रातंर्गत येत असलले्या आमगाव – देवरी मार्गावर लोहारा गावाजवळ आज सकाळी 7 वाजेच्या सुमारास मालवाहक टेम्पो पलटल्याने झालेल्या अपघातात टेम्पोमधील(MH 35 AJ 1832) एका महिलेचा जागीच मृत्यू झाला तर 3 गंभीर जखमी असल्याची घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार छत्तीसगड राज्यातून आमगाव तालुक्यातील बोरकन्हार येथील वीटभट्टयावर काम करण्यासाठी एका मालवाहक टेम्पोमधून 20 कामगारांना नेण्यात येत होते.दरम्यान टेम्पो चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने वाहन रस्त्याच्या कडेला शेतात पलटले व अपघात घडला.यामध्ये मोतीनबाई दहारिया (वय 45) यांचा जागीच मृत्यू झाला.तर 3 गंभीर रुग्णांना ग्रामीण रुग्णालय देवरी येथे हलविण्यात आले.इतर किरकोळ जखमींना प्राथमिक आरोग्य केंद्र मुल्ला येथे हलविण्यात आले आहे.घटनेचा पुढील तपास देवरी पोलीस तपास करीत आहेत.





