40.6 C
Gondiā
Sunday, June 7, 2026
Home शैक्षणिक ठोस कारवाई न झाल्यास संपूर्ण महाराष्ट्र बंद

ठोस कारवाई न झाल्यास संपूर्ण महाराष्ट्र बंद

0
67

blank

प्रशिक्षणार्थी डॉक्टरांची पत्रकार परिषदेत माहिती

यवतमाळ-वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रशिक्षणार्थी डॉक्टर अशोक पाल यांची हत्या झाली आहे. या प्रकरणात अद्यापही पोलिस प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे या प्रकरणातील आरोपींना पोलिसांनी अटक न केल्यास महाराष्ट्रातील संपूर्ण वैद्यकीय महाविद्यालयात हा संप पुकारण्यात येईल, असा इशारा शुक‘वार, 12 नोव्हेंबर रोजी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत प्रशिक्षणार्थी डॉक्टरांनी दिला. दरम्यान आज विदयार्थ्यांच्या मागणीनुसार वैदयकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मिलींद कांबळे यांनी आपला राजीनामा वरीष्ठांकडे पाठविला आहे.
या प्रसंगी स्वप्नील काजळे, सचिन बेले, सागर जेठे इत्यादी उपस्थित होते. पुढे बोलताना स्वप्नील काजळे म्हणाले, डॉ. अशोक पाल यांच्या घरच्यांना शासनाकडून 50 लाख रुपयांची मदत तत्काळ देण्यात यावी. तसेच डॉ. पाल यांची हत्या करणार्‍या आरोपींना पोलिसांनी तत्काळ अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी. अन्यथा हे संप महाराष्ट्रातील संपूर्ण वैद्यकीय महाविद्यालयात पुकारण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
आम्ही पुकारलेल्या संपामुळे कोणत्याही रुग्णांची गैरसोय होणार नाही. याकरिता आम्ही वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावर रुग्णांचा उपचार करणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले आहे.

वैदयकीय महाविदयालय परीसरात लाईट्स नाही, सीसीटीव्ही सुध्दा नसल्याने विदयार्थ्यांच्या जिवीताला धोका असल्याचे समोर आले आहे. दरम्यान आता विदयार्थ्यांचे हे आंदोलन चिघळत चालले असून आज श्री व ना शा वै महाविदयालयाच्या माजी विद्यार्थ्यांनी सुध्दा आंदोलनाला पाठिंबा जाहिर केला. यामध्ये डॉ. सचिन बेले, डॉ सतीश चिरडे, डॉ. पियुष बरलोटा, डॉ. विकास येडशीकर डॉ निशांत चव्हाण डॉ. स्वप्नील मानकर डॉ. रमा बाजोरिया डॉ. रुपेश बावणे डॉ.गजानन मस्के, डॉ. अर्चना मस्के, डॉ. स्मिता चव्हाण, डॉ. अरुण जनबंधू, डॉ शरद राखुंडे, डॉ चंद्रशेखर धूर्वे, डॉ प्रफुल्ल मसराम, डॉ. वैभव फड, डॉ नाझिया काझी, डॉ शीतल मानकर, डॉ सौद देशमुख यांचा समावेश आहे. आंदोलन स्थळांना भेट देऊन दिवंगत विद्यार्थी डॉ अशोक पाल याला र्शद्धांजली वाहिली. तसेच कॉलेजच्या अनेक माजी विद्यार्थ्यांनी जे यवतमाळ च्या बाहेर देशात सर्वत्र कार्यरत आहे अशा काही विद्यार्थ्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारा संवेदना व्यक्त करून आंदोलनास पाठिंबा जाहीर केला. ज्यामध्ये डॉ. अतुल फुलझेले आयपीएस कमिशनर ऑफ पोलीस हिमाचल प्रदेश, डॉ. विनय राठोड डीसीपी ठाणे, डॉ उपसेन बोरकर कमिशनर इन्कम टॅक्स नागपूर यांचा समावेश आहे. आयएमए ने सुध्दा  अत्यावश्यक सेवा वगळता कामबंद करण्याची घोषणा केली आहे. उद्या सकाळी ८ वाजल्या पासून ते रात्री ८ वाजे पयर्ंत कामबंद आंदोलन करण्यात येणार आहे. अशी माहिती डॉ संजीव जोशी, डॉ प्रशांत कसारे यांनी दिली. एवढेच नव्हे तर मयत उदयोन्मुख डॉक्टर अशोक पाल यांच्या कुटुंबाला मदत करण्याच्या उद्देशाने तसेच पाल परिवाराचा भार काहीसा हलका करण्याच्या उद्देशाने त्याच्या भावाच्या शिक्षणाची जबाबदारी अनुक्रमे डॉ. अनुप कोठारी आणि डॉ प्रशांत कसारे यांनी स्वीकारली. आएमए कडून पाठपुरावा करून आंदोलन कर्त्याच्या मागण्या पूर्ण करण्यास मदत करणे, तसेच ही केस फास्ट ट्रॅक पद्धतीने चालवून आरोपीला कठोर शिक्षा होईल याची काळजी घेणार अशे आश्‍वासन सुद्धा आएमए तर्फे देण्यात आले. यवतमाळ डेन्टल असोसिएशन च्या पदाधिकर्‍यांनी सुद्धा आंदोलनाला पाठिंबा दिला. घडलेल्या अमानविय घटनेचा तीव्र निषेध आणि सुरु असलेल्या विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा म्हणून आज काळ्या फिती लावून निषेध दिन पाळण्यात आला. मार्ड आणि एसआरएसी सोबत समन्वय साधून आंदोलनकर्त्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास पुढे काम बंद आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. मृतक अशोक हा अत्यंत हलाकीच्या परिस्थितीमध्ये शिक्षण घेत असल्यामुळे, आणि घरचा जबाबदार पुरुष असल्यामुळे त्याच्या परिवाराच्या मदतीकरीता निधी गोळा करणे, तसेच तात्काळ मदत म्हणून रु 3 लाखाचा धनादेश मयताच्या आई ला सुपूर्त करणे व आणखी मदत गोळा करून ती पाल कुटुंबीयांना सुपूर्त करणे असे ठरविले. यावेळी आयएमए चे अध्यक्ष डॉ. संजीव जोशी, सचिव डॉ. प्रशांत कसारे, डॉ अशोक चौधरी, डॉ श्री व सौ कावलकर, डॉ सुनील अग्रवाल, डॉ सारिका शाह, डॉ संजय र%पारखी, डॉ सतीश चिरडे, डॉ जावेद सौदागर, डॉ सागर झोपाटे, डॉ स्वप्नील मानकर, डॉ शरद राखुंडे, डॉ आशीष उजवणे, डॉ अरुण जनबंधू, डॉ अपर्णा बाहेती, डॉ. भरत राठोड, डॉ स्नेहा राठोड, डॉ सुबोध तिखे आदि उपस्थित होते.

blank