35.7 C
Gondiā
Sunday, June 7, 2026
Home राजकीय राष्ट्रवादी काँग्रेसचे नवे जिल्हाध्यक्ष गंगाधर परशुरामकर

राष्ट्रवादी काँग्रेसचे नवे जिल्हाध्यक्ष गंगाधर परशुरामकर

0
236

blank

गोंदिया,दि.16ः-राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विजय शिवणकर यांनी राजीनामा दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार प्रफुल पटेल यांच्या सुचनेवर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जिल्हा परिषदेचे माजी गटनेते गंगाधर परशुरामकर यांची गोंदिया जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हाध्यक्ष पदावर नियुक्ती केली आहे.परशुरामकर यांना जिल्हा कार्यालयात माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देत स्वागत करण्यात आले.यावेळी माजी जिल्हाध्यक्ष विनोद हरिणखेडे,माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेश हर्षे,किशोर तरोणे,युवक अध्यक्ष केतन तुरकर,अशोक शहारे,सुनिल पटले आदी उपस्थित होते.blank

blank