37.1 C
Gondiā
Thursday, June 4, 2026
Home विदर्भ ग्रामपंचायतमधील रिक्त झालेल्या पदांच्या पोटनिवडणूकीचा निवडणूक कार्यक्रम जाहिर

ग्रामपंचायतमधील रिक्त झालेल्या पदांच्या पोटनिवडणूकीचा निवडणूक कार्यक्रम जाहिर

0
160

blank

गोंदिया,दि.18 : निवडणूक आयोगाच्या 8 नोव्हेंबर 2021 च्या आदेशानुसार निधन, राजीनामा, अनर्हता किंवा इतर अन्य कारणांमुळे रिक्त झालेल्या पदांच्या पोटनिवडणूका घेण्यासाठी 12 नोव्हेंबर 2021 रोजी प्रारुप मतदार यादी प्रसिध्द केली असून 18 नोव्हेंबर 2021 रोजी अंतिम मतदार यादी प्रसिध्द करण्यात येत आहे. गोंदिया जिल्ह्यातील पोटनिवडणूका असलेल्या ग्रामपंचायतींची संख्या 65 असून रिक्त जागांची संख्या 95 आहे.

निधन, राजीनामा, अनर्हता किंवा इतर अन्य कारणांमुळे ग्रामपंचायतमधील रिक्त झालेल्या पदांच्या पोटनिवडणूकांकरीता पारंपारिक पध्दतीने राबविण्यात यावयाचा प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून त्यानुसार नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गाची अतिरिक्त ठरलेली रिक्त जागा सर्वसाधारण जागा म्हणून अधिसूचित करण्यासाठी पूर्वी सार्वत्रिक निवडणूकीसाठी प्रसिध्द केलेल्या अंतिम प्रभाग रचनेच्या अधिसूचनेमध्ये सुधारणा करण्याचा दिनांक 22 नोव्हेंबर 2021 पर्यंत. तहसिलदारांनी निवडणूकीची नोटीस प्रसिध्द करण्याचा दिनांक 22 नोव्हेंबर 2021. नामनिर्देशनपत्रे मागविण्याचा व सादर करण्याचा व सादर करण्याचा दिनांक 30 नोव्हेंबर 2021 ते 6 डिसेंबर 2021, वेळ सकाळी 11 ते दुपारी 3 पर्यंत.
नामनिर्देशनपत्र छाननी करण्याचा दिनांक 7 डिसेंबर 2021 रोजी सकाळी 11 पासून ते छाननी संपेपर्यंत. नामनिर्देशनपत्र मागे घेण्याचा अंतिम दिनांक 9 डिसेंबर 2021 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत. निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा तसेच अंतिमरित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिध्द करण्याचा दिनांक 9 डिसेंबर 2021 रोजी दुपारी 3 वाजेनंतर. आवश्यक असल्यास मतदानाचा दिनांक 21 डिसेंबर 2021 रोजी सकाळी 7.30 पासून ते सायंकाळी 5.30 पर्यंत. मतमोजणीचा दिनांक 22 डिसेंबर 2021 (मतमोजणीचे ठिकाण व वेळ जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्यतेने तहसिलदार निश्चित करतील त्यानुसार राहील). जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत निवडणूकीच्या निकालाची अधिसूचना प्रसिध्द करण्याचा अंतिम दिनांक 27 डिसेंबर 2021 पर्यंत आहे. असे राज्य निवडणूक आयोगाचे सचिव किरण

blank