39.8 C
Gondiā
Thursday, June 4, 2026
Home विदर्भ  जाती दावा पडताळणी कार्यालय 19 नोव्हेंबरला सुट्टीच्या दिवशी  सुरु राहणार

 जाती दावा पडताळणी कार्यालय 19 नोव्हेंबरला सुट्टीच्या दिवशी  सुरु राहणार

0
32

गोंदिया,दि.18 : सन 2021-22 या शैक्षणिक सत्रात ज्या मागासवर्गीय
विद्यार्थ्यांनी अनुसूचित जाती, विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागास
वर्ग व विशेष मागास प्रवर्ग या आरक्षीत प्रवर्गातून पुढील व्यावसायिक
शिक्षण प्रक्रियेमध्ये (सीईटी, नीट, एनटीए सारख्या) सहभाग घेऊन
अभियांत्रिकी, वैद्यकीय, फॉर्मसी, अध्यापन पदवी यासारख्या
अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेऊ इच्छितात व ज्यांनी त्यांचे जाती दावा
पडताळणीचे प्रकरण जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती,गोंदिया येथे सादर
केले आहेत, मात्र त्यांचे प्रकरणात त्रुटी आढळून आलेल्या आहेत अशा
विद्यार्थ्यांना त्यांचे प्रकरणातील त्रुटी समिती कार्यालयाद्वारे
कळविण्यात आलेल्या आहेत. तथापी, अद्यापही ज्या विद्यार्थ्यांनी त्यांचे
जाती दावा पडताळणी प्रकरणात त्रुटींची पुर्तता केलेली नाही व ज्या
विद्यार्थ्यांना अद्यापही जात वैधता प्रमाणपत्र ई-मेलद्वारे प्राप्त
झालेले नाही त्या विद्यार्थ्यांनी त्यांचे सीईटी/नीट परीक्षेच्या
स्कोरशीटसह त्यांचे जाती दावा पडताळणी प्रकरणातील त्रुटी संदर्भात आवश्यक
त्या पुराव्यासह तात्काळ कार्यालयात उपस्थित राहावे.

तसेच सन 2021 मध्ये ग्रामपंचायत, नगरपंचायत व नगरपरिषद या
स्थानिक स्वराज्य संस्थेअंतर्गत विजयी झालेल्या उमेदवारांचे अनुसूचित
जाती व नागरिकांचे मागास प्रवर्ग या मागासवर्गीयांचे आरक्षीत प्रवर्गातून
प्रस्ताव समिती कार्यालयात सादर करण्यात आलेले आहेत, मात्र ज्या प्रकरणात
अर्जदारांनी त्रुटींची पुर्तता केलेली नाहीत ते प्रकरण समितीद्वारे
नस्तीबध्द करण्यात आलेले आहेत. करीता अशा सर्व आरक्षीत प्रवर्गातून विजयी
उमेदवांरांनी त्यांचे प्रकरणातील त्रुटी पुर्तते संदर्भात आवश्यक त्या
पुराव्यासह व विजयी प्रमाणपत्रासह जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती
कार्यालयात तात्काळ कार्यालयीन वेळेत 22 नोव्हेंबर ते 26 नोव्हेंबर 2021
दरम्यान उपस्थित राहावे.

19 नोव्हेंबरला गुरुनानक जयंती निमित्ताने सार्वजनिक सुट्टी
असली तरी समिती कार्यालय सुरु राहणार आहे. करीता सदर तारखेस व्यावसायीक
अभ्यासक्रमातील अर्जदार व ग्रामपंचायत, नगरपंचायत व नगरपरिषद इत्यादी
विजयी झालेल्या मागासवर्गीय उमेदवारांनी अद्यापपर्यंत त्रुटींची पुर्तता
केलेली नाही त्यांनी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती गोंदिया,
डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, जिल्हाधिकारी कार्यालयाचे मागे,
गोंदिया येथे सर्व मूळ कागदपत्रासह व त्रुटी पुर्ततेसंदर्भात अतिरिक्त
पुराव्यासह उपस्थित राहावे. असे उपायुक्त तथा जिल्हा जात प्रमाणपत्र
पडताळणी समितीचे सदस्यांनी केले आहे.