38.4 C
Gondiā
Thursday, June 4, 2026
Home विदर्भ रुस्तमपूर येथे क्रांतीवीर बिरसा मुंडा जयंती साजरी

रुस्तमपूर येथे क्रांतीवीर बिरसा मुंडा जयंती साजरी

0
41

blank

तिरोडा,दि.22: तालुक्यातील रुस्तमपूर येथे क्रांतीवीर महामानव बिरसा मुंडा यांच्या १४६ व्या जयंतीनिमित्त आदिवासी युवा संघटन व बिरसा फायटर समिती तर्फे ‘जलसा’ व आदिवासी पारंपरिक गोंडी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन उत्हासात पार पडले.कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे जगदीश(बालु)बावनथडे़ होते तर उद्घाटक म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे युवानेते रविकांत बोपचे उपस्थित होते.क्रांतीवीर बिरसा मुंडा यांची जयंती साजरी करतांना महापुरूष कधीही कोणत्या एका समाजाचे नाहीतर संपूर्ण देशाचे असतात आपण जेव्हढं त्यांना पुजतो तेव्हढं आम्हीही पुजत असतो कारण त्यांचा लढा सर्वच देशावासियांसाठी होता असे विचार बावनथडे यांनी यावेळी व्यक्त केले.

blank