38.8 C
Gondiā
Monday, June 8, 2026
Home विदर्भ बुद्धनगरी पवनीत तिसरे राज्य अधिवेशन

बुद्धनगरी पवनीत तिसरे राज्य अधिवेशन

0
34

blank

पवनी-बुध्दकालीन वैभवसंपन्न असलेल्या पवनी नगरीत पवनीच्या इतिहासावर भाष्य करतांना पुरातत्व विभागाच्या उत्खननात मिळालेल्या बौद्धस्तुपाच्या अवशेषांचे जतन व इतिहासाचे स्मरण करण्यासाठी भारत मुक्ती मोर्चा संलग्नित बुद्धिष्ट इंटरनॅशनल नेटवर्कद्वारा तिसरे राज्य अधिवेशन घेण्यात आले.
चंद्रमनी बौध्द विहार पवनीच्या आवारात संपन्न झालेल्या अधिवेशनाच्या अध्यक्षपदी राष्ट्रीय संरक्षक बुद्धिष्ट इंटरनॅशनल नेटवर्क वामन मेर्शाम तर उद्घाटक म्हणून भदंत ज्ञानज्योती महाथेरो उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून पुरातत्व विभागाचे अभ्यासक प्रियदश्री खोब्रागडे, विलास खरात, डॉ. विवेक घाटे, तहसीलदार नीलिमा रंगारी, भदन्त शांतीर%, भदंत संघपाल, असिस्टंट डायरेक्टर दूरदर्शन मुंबई काशिनाथ सोनवणे हे होते. तर कार्यक्रमाला विकास राऊत, प्रेमचंद सूर्यवंशी, प्रमोद घरडे, उषा इंगोले, रा. ज. चित्तूरकर, चंद्रमणी घोनमोडे, संजय वाळके, वैशाली सतदेवे, पुष्पा बौद्ध, शैलेश मयूर, ईश्‍वर मेर्शाम, भन्ते सोमानंद इत्यादी उपस्थित होते.
सदर कार्यक्रमात पवनी येथील तीन प्राचीन बौद्ध स्तूप तसेच कुही येथील बुद्धकालीन अँडम बुद्ध स्तूपाला भारतीय पुरातत्त्व विभागच नष्ट करीत असेल तर जनतेने काय करायला हवे? यावर चर्चा करण्यात आली. दीक्षाभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित ब्राह्मणांचे नियंत्रण राहणे हे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्म चळवळीला रोखण्याचे आरएसएसचे षडयंत्र आहे. म्हणून दीक्षाभूमी मुक्ती आंदोलन सुरू करणे काळाची गरज आहे, असे सांगतांना तब्बल ४0 वर्षे उलटूनही महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संपूर्ण साहित्य सरकारने अजूनही प्रकाशित का केले नाही? अशा विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.
अधिवेशनाला विदर्भातुन हजारोंच्या संख्येने बौध्द उपासक-उपासिका उपस्थित होत्या. दरम्यान बौद्धधम्मीय तथा आंबेडकरवादी ग्रंथसंपदेचे स्टॉल मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी उपलब्ध होते.

blank