38.2 C
Gondiā
Monday, June 8, 2026
Home विदर्भ 9 फुटाच्या अजगर सापाला सर्पमित्राने दिले जीवदान

9 फुटाच्या अजगर सापाला सर्पमित्राने दिले जीवदान

0
30

blank

अजुनी-मोरगाव : शहरातील सरस्वती राईस मिलमध्ये कामगारांना अजगर साप आढळून आला. ही माहिती स्थानिक सर्पमित्र राहुल लाडे, मुकेश पवार आणि वनविभागाला देण्यात आली. सर्पमित्रांनी मोठ्या कसरतीने या अजगर सापाला ताब्यात घेतले. सदर अजगर 9 फूट लांबीचा असल्याची माहिती सर्पमित्रांनी दिली.यावेळी वनविभागाचे वेलतुरे, इरखेडे आणि छोले उपस्थित होते. अजगराला अरततोंडी जंगल परिसरात सोडण्यात आले.

blank