34.7 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home विदर्भ शास्त्री वॉर्डात अतिक्रमणाचा सपाटा,कारवाई करा; अन्यथा आंदोलन

शास्त्री वॉर्डात अतिक्रमणाचा सपाटा,कारवाई करा; अन्यथा आंदोलन

0
52

blank

महिलांचे नगराध्यक्षांना निवेदन
गोंदिया : शहरातील शास्त्री वॉर्डात अतिक्रमणाचा सपाटा सुरू झाला आहे. यामुळे रस्ते अरूंद होत असून नाल्यांचे अतिस्तत्व धोक्यात आले आहे. या प्रकारामुळे संतापलेल्या नागरिकांना नगर परिषदेवर धडक देवून कारवाई करण्याची मागणी केली आहे. या संदर्भात शिक्षण सभापती सुनिल तिवारी यांच्या माध्यमातून नगराध्यक्ष अशोक इंगळे यांना निवेदन देण्यात आले आहे. आगामी सात दिवसात आंदोलनकर्त्यावर कारवाई झाली नाही तर नगर परिषदेत ठिय्या आंदोलन करणार, असा इशाराही यावेळी उपस्थित महिलांनी दिला आहे.
सविस्तर असे की, शहरातील शास्त्री वॉर्ड येथे अनेक समस्यांनी डोकेवर काढले आहे. त्यातच अतिक्रमण करण्याचा प्रकार वाढल्याने नागरिकांना अनेक समस्यांना समोर जावे लागत आहे. मागील काही दिवसांपासून येथील रहिवास्यांनी रस्ते, नाल्यांवर अतिक्रमण करणे सुरू केले आहे. यामुळे नागरिकांची वहिवाट अडचणीत आली आहे. या प्रकाराला संतापून नागरिकांनी आक्रोश केला. परंतु, घर मालकाकडून महिला, सुज्ञ नागरिकांना दमदाटी दिली. तसेच काही महिलांना धक्काबुक्की करून शिवीगाळ केली. दरम्यान संतापलेल्या नागरिकांनी नगर परिषदेवर धडक देवून या प्रकरणी कारवाई करण्याची मागणी केली आहे. या संदर्भात शिक्षण सभापती सुनिल तिवारी यांच्या मार्फत नगराध्यक्ष अशोक इंगळे यांना निवेदन देण्यात आले आहे. आगामी सात दिवसात अतिक्रमण कर्त्यांवर कारवाई करा, अन्यथा नगर परिषदेत ठिय्या आंदोलन करणार, असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे.
निवेदन देतेवेळी रूपाली रोटकर, कमला मोरघडे, भाग्यश्री कटरे, सपना मेश्राम, सुस्तकला रोटकर, अंबिका गजभिये, रजनी कुरील, सुशिला मोरघडे, कचरीबाई स्मिथ, अमित गंगभोज, निशांत मोरघडे, नरेंद्र रोटकर, प्रशांत मोरघडे, अरविंद राऊत, राकेश सोमनकर, शशि मोरघडे आदिंसह शास्त्री वॉर्ड येथील रहिवासी उपस्थित होते.

blank