
गोंदिया,दि.27ः- गोंदिया जिल्हा कांग्रेस कमेटीच्या आज (दि.27) येथील शहीद भोला भवन येथे पार पडलेल्या सभेत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत प्रदेश महासचिव आमदार व प्रभारी अभिजीत वंजारी, आमदार सहसराम कोरेटे, जिल्हा अध्यक्ष दिलीप बन्सोड, प्रदेश महासचिव एन.डी.किरसान, प्रदेश सचिव पी.जी.कटरे,अमर वराडे,तालुका कांग्रेस कमेटी अध्यक्ष मधुसूदन दोनोडे,राजेश नंदागवळी,जिल्हा महासचिव दामोदर नेवारे,राजु पालिवाल, पुष्पा खोटेले ,शहर अध्यक्ष अनिल राजगीरे आदींच्या उपस्थितीत सड़क अर्जुनी बाजार समितीचे संचालक रोशन बडोले व डव्वा आदिवासी सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष आनंद जोशी यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
रोशन बडोले व आनंद जोशी यांच्या पक्ष प्रवेशाबद्दल राजाभाऊ गुब्रेले,वामेश्वर टेंभरे,किरण हटवार,किशोर शेंडे,दिनेश हुकरे,सविता कापगते,सिन्धु बारसागडे,ठामेन्द्र तुरकर,कमलेश मुंगुलमारे,योगेश येळे,हुशेन युसुफ पटेल,विस्मय बडोले यांनी अभिनंदन केले.





